मोबाईल रिपेअरिंगचं दुकान, बसमधून प्रवास करत प्रचार, कोण आहेत चन्नींना हरवणारे लभ सिंग?

एक्झिट पोलनी वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापन केली आहे. दिल्लीनंतर आणखी एका राज्यात आपने सत्ता स्थापन केली आहे. आम आदमीच्या या विजयाचे अनेक जण शिल्पकार ठरले आहेत. कॅप्टन अमरिंदर, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, मजिठीया अशा दिग्गज नेत्यांना आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी पराभवाचा धक्का दिला. यात मुख्यमंत्री चरणजीत […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:00 AM • 10 Mar 2022

follow google news

एक्झिट पोलनी वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापन केली आहे. दिल्लीनंतर आणखी एका राज्यात आपने सत्ता स्थापन केली आहे. आम आदमीच्या या विजयाचे अनेक जण शिल्पकार ठरले आहेत. कॅप्टन अमरिंदर, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, मजिठीया अशा दिग्गज नेत्यांना आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी पराभवाचा धक्का दिला. यात मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना भादूर मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या लभ सिंग यांनी मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत केलं आहे. भादूर मतदार संघासोबत चमकूर साहीब मतदार संघातही चन्नी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हे वाचलं का?

लभ सिंग यांनी चन्नींचा सामना करताना वापरलेली पद्धत आणि रणनिती ही वाखणण्याजोगी आहे. भादूर मतदारसंघ हा पंजाबच्या बर्नाला मतदारसंघात येतो. या मतदारसंघातील दलित मतांचा विचार करुन काँग्रेसने चन्नी यांना तिकीट दिलं होतं. परंतू आम आदमी पक्षाच्या लभ सिंग यांनी यंदाच्या निवडणुकीत सर्व फासे उलटवले आहेत.

Punjab Election Counting: ‘आप’चा विद्यामान मुख्यमंत्रांना डबल शॉक; चन्नी आजच राजीनामा देणार?

मुख्यमंत्री चन्नी यांनी या मतदारसंघात स्वतःची प्रतिमा गरीब घरातला मुलगा अशी तयार केली असली तरीही आमचे विजयी उमेदवार लभ सिंग हे मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवायचे. 2014 साली लभ सिंग यांनी विकत घेतलेली हिरो होंडाची एक बाईक हे एकमेव वाहन त्यांच्याकडे असून आपल्या निवडणुक प्रतिज्ञापत्रातही त्यांनी याचा उल्लेख केला आहे.

लभ सिंग यांची साधी जीवनशैली ही त्यांच्या विजयात खूप महत्वाची ठरली. अनेक पक्षाचे उमेदवार प्रचार करत असताना मोठमोठ्या रॅली, मिरवणुका यांच्यावर भर द्यायचे. परंतू लभ सिंग यांनी यासाठी एक वेगळा मार्ग स्विकारला होता. ते बस स्टँडवर जाऊन स्थानिक लोकांशी बोलून आपला प्रचार करायचे तर कधी स्वतः त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करुन आपला प्रचार करायचे. निवडणुक आयोगाने कोरोनामुळे यंदा प्रचारावर निर्बंध घातले होते. याचा आपल्याला फायदाच झाल्याचं लभ सिंग म्हणाले.

Punjab Election Counting:’कोहली’ने घेतली ‘कॅप्टन’ची विकेट, पंजाब काँग्रेसच्या हातातून निसटलं

स्वतःचा प्रचार करण्यासाठी माझ्याकडे फारसे पैसे नव्हते. ज्यामुळे मी दारोदारी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ज्यामुळे माझा बराच पैसा वाचला. दुसरीकडे स्वतःला गरीब घरातला मुलगा म्हणवणारे मुख्यमंत्री चन्नी हे प्रचारादरम्यान गाड्यांचा ताफा आणि सुरक्षाव्यवस्थेशिवाय दिसलेच नाहीत.

‘तुम्हालाही काहीतरी करायचंय’; पंजाबचं तख्त जिंकताच केजरीवालाची भारतीयांना हाक

अण्णा हजारेंच्या आंदोलनाने प्रेरित होऊन लभ सिंग यांनी 2013 साली आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. लभ सिंग यांची आई ही सरकारी शाळेत सफाई कर्मचाऱ्याचं काम करते तर त्यांचे वडील हे चालक आहेत. 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर लभ सिंग यांनी मोबाईल दुरुस्तीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आपल्या गावात दुकान सुरु केलं. परंतू गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी हे दुकान बंद ठेवलं आहे.

आम्ही देशभरात काँग्रेसची जागा घेणार, पंजाबमधील यशानंतर ‘आप’चा आत्मविश्वास दुणावला

लभ सिंग यांचा मोठा भाऊ हा भारतीय सैन्यात होता. काही महिन्यांपूर्वीच शिपाई पदावर निवृत्त झालेल्या त्यांच्या भावाने लभ यांना प्रचारात मदत केली होती.

    follow whatsapp