Crime News : एका महिलेनं आपल्याच दोन मुलांना विष पाजून मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना बिहारच्या औरंगाबादमधील ओब्रा ब्लॉकच्या खुडवा पोलीस ठाणे परिसरातील पथरा गावात घडली आहे. लाडूत आईनेच विषारी पदार्थ मिसळल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आईला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वासनांध काकीचे पुतण्यासोबत होते शारीरिक संबंध, पण काकासोबत...
पोलिसांनी या प्रकरणात सांगितलं की, पथरा गावात दोन मुलांनी विषारी लाडू खाल्ल्याने दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात कुटुंबातील सदस्यांनी अज्ञात लोकांमुळे ही घटना घडवल्याचा संशय व्यक्त केला. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आईने गव्हामध्ये विष मिसळून मुलांना खायला दिले
या प्रकरणात तपासादरम्यान, पोलिसांना मृत मुलांची आई संयुक्ता कुमारी हिच्यावर अधिकचा संशय बळावला. या प्रकरणात कडक चौकशी करण्यात आली असून तिने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. या प्रकरणात महिलेनं सांगितलं की, तिचा आपल्या पतीशी वाद झाला होता. यादरम्यान, तिने गव्हांत विष मिसळले आणि तेच आपल्या मुलांना खायला दिले होते. त्यानंतर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : 'मॅडम तुमचे 'तसले' फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन', वाहन चालकाने आपल्याच मॅडमला केलं ब्लॅकमेल
दोन मुलांचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संयुक्ता कुमारीला अटक करण्यात आली होती. नंतर पथरा गावात दोन मुलांचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली होती. तेव्हा आईनेच सांगितलं की, गव्हामध्ये मी विष मिसळून त्यांना खायला दिलं आणि मारलं. आईने दिलेल्या या कबुलीनाम्यामुळे सर्वच थक्क झाले.
ADVERTISEMENT











