Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका आता पुन्हा वाढताना दिसत आहे. या हवामानात पुढील काही दिवस चढ-उतार कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागात थंडीचा जोर कामय राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. अशातच 10 जानेवारी रोजी राज्यातील हवामानाची एकूण परिस्थिती कशी असेल ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नाशिकमध्ये तपोवनावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल, फडणवीसांचं नाव न घेता म्हणाले, 'लाकुडतोड्या तरी..'
कोकण :
कोकण विभागात मुख्यत्वे आकाश हे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. तसेच याच विभागात दिवसभर हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी थंडीचं वातावरण निर्माण होणार आहे. या विभागातील पुणे शहरात सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. तर याच विभागात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात सकाळी थंडीचं वातावरण राहण्याची शक्यचा आहे. तसेच आकाश पांढरं शुभ्र दिसणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरात तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यात वातावरण स्थिर राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, शिंदेसेनेत केला होता प्रवेश, पाहा कुठून लढणार?
विदर्भ :
विदर्भ विभागात थंडीचा जोर कायम तसाच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सकाळी गारठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर हुडहुडी जाणवण्याची चिन्हे आहेत. काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस आसपास घसरल्याने गारठा वाढल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT











