बाथरूममध्ये भयानक अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह! धक्कादायक दृश्य अन्... नेमकं प्रकरण काय?

बाथरूममध्ये जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला. आता, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.

भयानक अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह!

भयानक अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह!

मुंबई तक

• 04:42 PM • 09 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाथरूममध्ये भयानक अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह!

point

धक्कादायक दृश्य अन्... नेमकं प्रकरण काय?

Crime News: झारखंडच्या दुमका परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे बाथरूममध्ये जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला. आता, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव नमिता गोडाई असून ती 53 वर्षीय होती. तसेच, पीडिता ही दुमका नगर पोलीस स्टेशन हद्दीतील बघनोचा कॉलनीतील रहिवासी होती. पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी पोलिसांना संबंधित प्रकरणाची माहिती दिली आणि घटनेची माहिती मिळताच, दुमका टाउन पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस घरात पोहोचल्यानंतर त्यांना बाथरूममध्ये पीडितेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. सुरूवातीच्या तपासात, घटनास्थळावर संशयास्पद परिस्थिती आढळली आणि त्यानंतर, पोलिसांनी फॉरेन्सिक तपास सुरू केला. 

हे ही वाचा:  मुंबईची खबर : हायकोर्टाने आदेश देऊनही वांद्रे स्कायवॉक बंद... काम सुद्धा पूर्ण, मग नेमकं कारण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून महिलेच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्यार स्पष्ट झालेलं नाही. आता, पीडितेनं आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली? याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 

हे ही वाचा: चंद्रपूर हादरलं! पत्नीला घरात जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून पसार... उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

पोलिसांनी दिली माहिती... 

पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आल्यानंतर महिलेच्या मृत्यूमागच्या नेमक्या कारणांचा खुलासा होईल. तसेच, पीडितेच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली जात आहे. पोलीस कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारे कायदेशीर कारवाई करणाऱ्या असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटनेनंतर, संपूर्ण कॉलनीमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच, आसपासच्या लोकांमध्ये देखील या प्रकरणाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून लवकरच या घटनेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp