चंद्रपूर हादरलं! पत्नीला घरात जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून पसार... उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
चंद्रपूर येथील महाकाली वॉर्डच्या गौतम नगर परिसरात एका 27 वर्षीय विवाहित महिलेला जिवंत जाळण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीला घरात जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून पसार...
चंद्रपूरमधील धक्कादायक घटना
Chandrapur Crime: चंद्रपूर येथील महाकाली वॉर्डच्या गौतम नगर परिसरातून अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. येथे एका 27 वर्षीय विवाहित महिलेला जिवंत जाळण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीक्षा शुभम भडके अशी मृत महिलेची ओळख समोर आली असून या प्रकरणात दीक्षाचा पती शुभम भडके याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
रागाच्या भरात पतीने आग लावली
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 5 जानेवारी 2026 रोजी रात्री जवळपास 9 वाजताच्या सुमारास घडली. पीडितेचा पती शुभम घरी आल्यानंतर, त्या पती आणि पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून मोठा वाद झाला. हा वाद सुरू असतानाच, त्याने रागाच्या भरात दीक्षाच्या कपड्यांना आग लावली आणि घराचा दरवाजा बंद करून तो घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पीडिता गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत...
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा मागील सहा ते सात महिन्यांपासून तिच्या आजीकडे राहत. ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. घटनेच्या वेळी, महिलेची आजी घरी नसल्याचा आरोपीने फायदा घेतला आणि आपल्या पत्नीसोबत निर्दयी कृत्य केलं. आग लागल्यानंतर, पीडित दीक्षा घरात एकटीच होती आणि बाहेरून दरवाजा बंद असल्याकारणाने ती असह्य होती. दरम्यान, पीडितेची आजी घरी परतली असता तिला दरवाजा बाहेरून बंद असल्याचं आढळलं आणि घरातून "वाचवा, वाचवा.." असा दीक्षाचा आवाड ऐकू येत होता. दरवाज उघडल्यानंतर, दीक्षा गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत होती. या घटनेनंतर, कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने सरकारी रुग्णालयाच्या 'आयसीयू'मध्ये भरती करण्यात आलं.
हे ही वाचा: फेरीवाल्याच्या प्रेमात आंधळी झाली पत्नी; तिच्याच घरात प्रियकर भाड्याने राहिला अन्... नैराश्यात पतीचं टोकाचं पाऊल!
पीडितेने स्पष्टपणे सांगितलं
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, दीक्षाच्या कुटुंबीयांनी तिची घटनेबद्दल विचारपूस केली. त्यावेळी दीक्षा बोलू शकत होती. त्यावेळी, तिने स्पष्टपणे सांगितलं की तिच्या पतीने तिच्या कपड्यांना आग लावली आणि दरवाजा बंद करून तो पळून गेला. पीडितेच्या कुटुंबियांनी दीक्षाच्या जबाबाचा व्हिडीओ देखील बनवला. मात्र, उपचारांदरम्यान तिची प्रकृती बिघडली आणि 7 जानेवारी रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला.










