मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीला आता अवघे 6 दिवस राहिले आहेत. अशावेळी मुंबईतील चेंबरूच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जहरी शब्दात टीका केली आहे. 'ते सांगतात की, ते मुंबईत जन्मले त्यामुळे त्यांना मुंबईची माहिती आहे. आता जन्मून तुम्ही जवान झाले आता म्हातारे झाले.. तरी मुंबईत काय केलं ते दाखवा ना..' असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी संजय राऊतांना दिलेल्या संयुक्त मुलाखतीत सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईतील नसल्याने त्यांना मुंबईच्या समस्या ठाऊक नाहीत अशी टीका केली होती. ज्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं उत्तर दिलं आहे.
'आता मी एक सवाल विचारतो.. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का?, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचा जन्मही मुंबईला झाला नव्हता. आणि जे स्वत:ला सांगतात की, आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे. आता जन्मून तुम्ही जवान झाले आता म्हातारे झाले.. तरी मुंबईत काय केलं ते दाखवा ना..' अशी जहरी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले...
'मी प्रकट मुलाखती केल्या, लोकांमध्ये जाऊन मुलाखती केल्या. पण आता नुकतंच एक दिवसापूर्वी काही मुलाखती पाहायला मिळाल्या. हा जो टीव्हीवरचा इंटरव्ह्यू होता. घरच्या माणसाचा घरच्यांनीच केलेला इंटरव्ह्यू होता. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसले होते. दुसरीकडे संपादक साहेब त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते. त्यांनी प्रश्न विचारायचे यांनी उत्तर द्यायचं. हा जो घरच्या घरी चाललेला इंटरव्ह्यू होता. आपल्याला माहिती असेल मी पहिल्या सभेत सांगितलं होतं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कन्फ्यूजन आणि करप्शन याची युती आहे.'
हे ही वाचा>> नाशिकमध्ये तपोवनावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल, फडणवीसांचं नाव न घेता म्हणाले, 'लाकुडतोड्या तरी..'
'ज्यावेळेस हे मी म्हणाले त्यावेळेस मी कोणाचं नाव घेतलं नाही. कोण कन्फ्यूज आहे कोण करप्ट आहे हे मी सांगितलं नाही. पण ज्यावेळेस ही मुलाखत झाली त्यावेळी संजय राऊतच म्हणाले राज साहेब फडणवीस तुम्हाला फडणवीस कन्फ्यूज म्हणाले आणि उद्धव साहेब फडणवीस तुम्हाला करप्ट म्हणाले.'
'आता मी टोपी फेकली होती.. ती संपादक साहेबांनी थेट त्यांच्या डोक्यात घातली. त्यांच्यावर अधोरेखित केलं कोण कन्फ्यूज आणि कोण करप्ट आहे.'
'या इंटरव्ह्यूमध्ये ते असेही म्हणाले की, फडणवीसांना काय समजतं. या ठिकाणी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते हे कोणीच मुंबईमध्ये जन्मलेले नाहीत. हे मुंबईत जन्मलेले नसल्यामुळे यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात?'
हे ही वाचा>> महाचावडी: '20 वर्षांचं भांडण सोडून जर मी एकत्र येऊ शकतो तर...', चावडीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले!
'आता मी एक सवाल विचारतो.. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का?, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचा जन्मही मुंबईला झाला नव्हता. आणि जे स्वत:ला सांगतात की, आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे. आता जन्मून तुम्ही जवान झाले आता म्हातारे झाले.. तरी मुंबईत काय केलं ते दाखवा ना.. 25 वर्ष या मुंबईत भोगली आता म्हातारपणाकडे चाललात.. मुंबईतील एक प्रोजेक्ट देखील तुम्ही दाखवू शकत नाहीत.'
'माझा सवाल आहे.. ज्या 106 हुतात्मांनी मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी जे रक्त सांडलं होतं त्यातील किती मुंबईत जन्मलेले होते? त्यात कोकणातील होते, विदर्भातील होते, प. महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील होते..'
'मी या ठिकाणी सांगतो.. होय माझा जन्म मुंबईत झाला नाही. पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवायचं काम आम्ही केलं.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT











