सचिन वाझेंनंतर या प्रकरणात अजून काहींना ताब्यात घेण्याची शक्यता

सौरभ वक्तानिया

• 06:05 AM • 14 Mar 2021

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशियत कारप्रकरणी API सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भात अजून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सचिन वाझेंव्यतिरीक्त अजून काही जणांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी NIA चा तपास सुरु आहे. त्याचप्रमाणे यामध्ये अजून काही पोलिसांची चौकशी होण्याचीही शक्यता आहे. मोठी बातमी: 13 तासाच्या […]

Mumbaitak
follow google news

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशियत कारप्रकरणी API सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भात अजून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सचिन वाझेंव्यतिरीक्त अजून काही जणांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी NIA चा तपास सुरु आहे. त्याचप्रमाणे यामध्ये अजून काही पोलिसांची चौकशी होण्याचीही शक्यता आहे.

हे वाचलं का?

मोठी बातमी: 13 तासाच्या चौकशीनंतर API सचिन वाझे यांना NIA कडून अटक

यामधील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या कारच्या मागच्या बाजूला पोलीस असंही लिहल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. त्यामुळे ही गाडी पोलीसाची असल्याची NIAकडून संशय व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून NIAला ही इनोव्हा कार बहुधा मुंबई पोलिसांची असल्याची माहिती दिली आहे.

वाझेंच्या अटकेनंतर मोठी घडामोड, NIA ला सापडली पांढरी इनोव्हा कार!

सचिन वाझेंच्या अटकेनंतर रविवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार टो करुन मुंबईतील एनआयए कार्यालयात आणली आहे. त्यामुळे ही तीच इनोव्हा कार आहे का? जी अंबानींच्या घराबाहेर दिसली होती याबाबत एनआयएचे अधिकारी आता तपास करत आहेत.

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच असं का वाटतंय भाजपला?: मुख्यमंत्री

याशिवाय या प्रकरणामध्ये आतापर्यंत आंतकवाद्यांचा हात नसल्याची माहिती आहे. जैश-उल-हिंदकडून आलेला टेलिग्राम मेसेज चुकीचा असल्याचं समोर आलंय. हा मेसेज तयार केला असून जैश-उल-हिंद या संस्थेविरोधात अजूनही कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

अँटेलिया प्रकरण, वाझेंची अटक आणि पांढऱ्या इनोव्हा कारचा नेमका संबंध काय?

25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. ज्यामध्ये जिलेटीन कांड्या आणि अंबानींच्या नावे धमकीचं पत्र मिळालं होतं.

जेव्हा पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओ कार पार्क केल्यानंतर त्या कारमधील संशयित व्यक्ती ही मागेच असणाऱ्या एका दुसऱ्या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं.

या सगळ्या दरम्यान, स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी मुंब्र्यातील खाडीत आढळून आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांना या प्रकरणी अटक करण्यात यावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली होती. दरम्यान काल सचिन वाझे यांना अटक करण्यात आली

    follow whatsapp