डोक्यात दगड घालून तरूणीची हत्या, कराड तालुक्यातली धक्कादायक घटना

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत उसाच्या शेतात पंचवीस वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी समोर आली. या घटनेने कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:17 AM • 03 Jan 2022

follow google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

हे वाचलं का?

कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत उसाच्या शेतात पंचवीस वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी समोर आली. या घटनेने कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुणे : गोड बोलून आईला शेतात नेलं अन् केली हत्या; वडिलांचाही तोडला अंगठा; मुलाचं क्रूर कृत्य

याबाबत अधिक माहिती अशी की कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या भैरोबा मंदिराच्या जवळ उसाच्या शेतामधून जाणाऱ्या वाटेवर युवतीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शेजारीच मोठा दगड पडला होता. त्यामुळे तिच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

धक्कादायक ! चुगली करुन बदनामी करतो म्हणून मित्रांनीच केला मित्राचा खून

मृतदेहाशेजरी पडलेल्या दगडाला रक्त लागले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे. दरम्यान प्रथमदर्शनी संबंधित युवतीच्या डोक्यात दगड घातल्याचे स्पष्ट झाले आहे. युवतीचे नाव अद्याप समजू शकले नाही. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp