…तर महाराष्ट्रात फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, नारायण राणेंचा धमकीवजा इशारा

मुंबई: शिंदे गट-ठाकरे गटामध्ये काल मध्यरात्री प्रभादेवीमध्ये राडा झाला. यामध्ये ठाकरे गटाच्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाचे दादरचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व नाट्यानंतर आज केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणेंनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

12 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:47 AM)

follow google news

मुंबई: शिंदे गट-ठाकरे गटामध्ये काल मध्यरात्री प्रभादेवीमध्ये राडा झाला. यामध्ये ठाकरे गटाच्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाचे दादरचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व नाट्यानंतर आज केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणेंनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे वाचलं का?

प्रभादेवी राड्यानंतर नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

नारायण राणे म्हणाले ”शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. ‘मातोश्री’च्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू असल्याची खोचक टीका नारायण राणेंनी केली आहे. पुढे राणे म्हणाले ”सदा सरवणकर हे आमचे मित्र आहेत. सध्या आमची युती आहे. मात्र युतीपेक्षाही ते आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. असे हल्ले करू नका नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणं, बोलणं, फिरणं अवघ होईल त्यासाठी परवानगीची गरज लागेल, असा गर्भित इशाराही नारायण राणेंनी शिवसेनेला दिला आहे.

नारायण राणे म्हणाले गोळीबार झालाच नाही

सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. नारायण राणेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कमीत कमी बंदूकीच्या गोळीचा आवाज तरी आला असता असं नारायण राणे यावेळी म्हणाले आहेत. परंतु सदा सरवणकर पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करतील असंही राणे म्हणाले.

मुंबईतील शिंदे गटाची ताकद त्यांना समजलीये

एकाच वेळी 40 आमदार फुटून बाहेप पडतात आणि डोळ्यादेखत सरकार स्थापन करतात यावरुन शिंदे गटाची काय ताकद हे त्यांना समजले असेल. दरम्यान काल प्रभावदेमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद महाराष्ट्रा पडलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्यावरुन चांगलेच सुनावले आहे.

    follow whatsapp