Narayan Rane Criticized CM Uddhav Thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दाऊदशी संबंध असलेले नवाबभाई चालतात, पण मुन्नाभाई चालत नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टोला लगावला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.
ADVERTISEMENT
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भाषा या भाषणात वापरली ती राज्याची संस्कृती नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून केलेली टीकाही चुकीची होती असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची तुलना मुन्नाभाईशी केली होती. हल्ली कुणीतरी मुन्नाभाई चित्रपटाप्रमाणे स्वतःला बाळासाहेब समजू लागला आहे. त्याच्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असं राज ठाकरेंबाबत उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता आज नारायण राणे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.
“डोक्यात केमिकल लोच्या झालेले मुन्नाभाई फिरत आहेत” उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
काय म्हणाले नारायण राणे?
केमिकल लोच्या असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वापरला. ही मुख्यमंत्र्यांची भाषा. मांडीला मांडी लावून बसलेले नवाबभाई चालतात. पण मराठीत मुन्नाभाई नाव असले तर चालत नाहीत. नवाबभाई चालतात कारण त्यांचा दाऊदशी संबंध आहे. १९९१ आम्हाला जे संरक्षण आहे ही त्यांची कृपा आहे. दाऊदचा संबंध भाजपसोबत जोडायचा. आमचा काय संबंध दाऊदशी? असं म्हणत नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे.
काही लोकांना संरक्षण देण्याबद्दल ते बोलले. पण चुकीच्या माणसाला दिले आहे का? १९९१ पासून मला सुरक्षा देण्यात आली आहे. उद्धवजी अजून १० वर्षे जरी मुख्यमंत्री असलात तरी नारायण राणेंनी आठ महिन्यात केलेल्या कामाची बरोबरी होऊ शकणार नाही. चेष्टा, विनोद करणे सोपे आहे. हे शिव्या संपर्क भाषण हों. सभेमध्ये फेरीवाले आणून बसवले होते. त्यांचा शिवसेनेशी संबंध काय? असाही प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.
मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. मी बाळासाहेब ठाकरेंचे विचार, हिंदुत्व, मराठी माणसाविषयीची आस्था आम्ही सगळं जवळून पाहिलं आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता परखडपणे बोलणारे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणणार. बाळासाहेब ठाकरे जे सांगायचे तसंच वागायचे आहे. १५ मे च्या सामनामध्ये जी काही वाक्यं आली आहेत त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री काय बोलू शकतात? कुठल्या भाषेत बोलू शकतात? याचा अंदाज येतो.
नारायण राणेंच्या ‘या’ बंगल्यावर होणार कारवाई, राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार
आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं, घर पेटवणारं नाही. असं वाक्य बोलले नसतं तर चाललं असते. अडीच वर्षात किती चुली पेटवल्या? किती बेरोजगारांना रोजगार दिले याचं उत्तर द्या. किती रोजगार आणले? किती मराठी मुलांना, मुलींना नोकऱ्या मिळाल्या ते सांगावं. आज केंद्र सरकारने किती नोकऱ्या दिल्या त्याची माहिती आली. मात्र हे सभा घेऊन सांगतात आम्ही नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांना मदत करणार हे सगळं अजून सांगतच आहेत. महानगरपालिकेच्या कारभारात भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे, अशीही टीका नारायण राणे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
