डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरण : ‘या’ कारणामुळे करण्यात आला खून; धक्कादायक बाब आली समोर

मुंबई तक

• 02:35 AM • 14 Feb 2022

नाशिक शहरात खळबळ माजवणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या हाती काही पुरावे आले असून, त्यावरून सुवर्णा वाजे यांच्या पतीवरील संशय बळावला आहे. नाशिक महापालिकेत कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृतदेहाचे जळालेल्या गाडीत अवशेष सापडले होते. या प्रकरणात पोलिसांनी त्यांचे […]

Mumbaitak
follow google news

नाशिक शहरात खळबळ माजवणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या हाती काही पुरावे आले असून, त्यावरून सुवर्णा वाजे यांच्या पतीवरील संशय बळावला आहे.

हे वाचलं का?

नाशिक महापालिकेत कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृतदेहाचे जळालेल्या गाडीत अवशेष सापडले होते. या प्रकरणात पोलिसांनी त्यांचे पती संदीप वाजे यांना अटक केलेली आहे. संदीप वाजे सध्या पोलीस कोठडीत असून, आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहे. त्याच नवीन माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली आहे.

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडाची उकल, पतीकडूनच हत्या झाल्याची पोलिसांची माहिती

सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात अटक असलेला मुख्य आरोपी संदीप वाजे याची सात दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. त्यानंतर त्याला इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेले संशयित संदीप वाजे तपासात सहकार्य करीत नसल्याची बाब पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली. पुरावे, साथीदार व तांत्रिक विश्‍लेषणासाठी कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील जयदेव रिके यांनी न्यायालयास केली होती. पोलीस तपासातील प्रगती, अपूर्ण राहिलेल्या बाबी लक्षात घेत न्यायालयाने संशयित संदीप वाझेला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.

नाशिक : ‘वेळ लागेल म्हणाली अन् मोबाईल स्विच ऑफ झाला’; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूने शहर हादरलं

दरम्यान, शुक्रवारी इगतपुरी सत्र न्यायालयात तपासी अधिकारी अनिल पवार व सरकारी वकील रिके यांनी तपासाबाबतची माहिती दिली. ‘संशयिताची चौकशी केली असता तसेच पोलीस तपासातील माहितीच्या आधारे मिळून आलेल्या पुराव्याचा तपशील सांगताना घटनास्थळी कारमध्ये मिळून आलेला चाकू, चाकू गाडीत ठेवण्याचा उद्देश काय होता? याचा तपास पोलीस करीत आहेत. मयताने केलेली मोबाईल चॅटिंग मोबाईलमधून डिलीट केली असून, संशयिताचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे डाटा रिकव्हर करण्यासाठी पाठविण्यात आला आहे,’ असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.

नाशिकमध्ये खळबळ! महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जळालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह

‘मोबाइलमधील चॅट का डिलीट केली? याचं उत्तर संशयित आरोपीला देता आलेलं नाही. संशयिताच्या मोबाईलमध्ये मयतास शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ मिळून आला आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. सुवर्णा वाजे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे शब्द वापरण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरोपीच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपी दुसरे लग्न करण्यासंदर्भात उल्लेख केलेला आहे. दुसरे लग्न करण्यासाठी डॉ. वाजे यांचा अडथळा संशयित आरोपीस असल्याचे निदर्शनास येत असल्याचं संबंधित घटनाक्रमावरून स्पष्ट होतं आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

    follow whatsapp