भाजपच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना मंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शब्द टाकणार!

मुंबई तक

• 11:33 AM • 31 Oct 2022

सोलापूर : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळावी, आणि त्यासाठी आम्ही वकिली करू. कारण भाजपमध्ये आमचेही ऐकणारे कोणीतरी आहेत, असं वक्तव्य करतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तसंच यातून पाटील यांनी भाजपमधील प्रवेशाआधीच आपलं राजकीय वजन अधोरेखित केलं असल्याचीही चर्चा आहे.   वैमानिक झाल्याबद्दल ऋतुजा राजन पाटील, रयत शिक्षण […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळावी, आणि त्यासाठी आम्ही वकिली करू. कारण भाजपमध्ये आमचेही ऐकणारे कोणीतरी आहेत, असं वक्तव्य करतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तसंच यातून पाटील यांनी भाजपमधील प्रवेशाआधीच आपलं राजकीय वजन अधोरेखित केलं असल्याचीही चर्चा आहे.  

हे वाचलं का?

वैमानिक झाल्याबद्दल ऋतुजा राजन पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब देशमुख, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अजिंक्यराणा पाटील या तिघांचा पापरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पापरी व भोसले कुटुंबीय यांच्या वतीने पापरी येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून बोलत हेाते.

रणजितसिंह मोहिते पाटील यांना सल्ला :

रणजितसिंह मोहिते पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची इच्छा व्यक्त करताना यावेळी पाटील यांनी मोहिते पाटील यांना सल्लाही दिला. राजन पाटील म्हणाले, ‘जिल्ह्याच्या विकासात, जडणघडणीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, (स्व.) गणपतराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील संपर्क कमी झाला आहे, तो त्यांनी वाढवावा.

राजन पाटील भाजपमध्ये जाणार?

मोहोळचे माजी आमदार असलेले राजन पाटील मागील काही काळांपासून राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच यादरम्यान त्यांनी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी आली होती. माढा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मध्यस्थीने ही भेट झाली होती. मात्र कारखान्याच्या प्रश्नांबाबत ही भेट असल्याचं स्पष्टीकरण माजी आमदार राजन पाटील यांनी दिलं होतं.

कोण आहेत राजन पाटील?

राजन पाटील १९९५ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवत त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. २००४ सालीही प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक केली. मात्र २००९ नंतर हा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे पाटील हे स्वत: निवडणूक लढवू शकले नाही. मात्र त्यानंतर झालेल्या तीनही विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे ताकद उभी केली.

    follow whatsapp