Crime News Marathi : मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील अकोदिया पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरातील पुजाऱ्यावर इयत्ता बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अकोदिया येथील 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी दररोज मंदिरात दर्शनासाठी जात होती. याच दरम्यान मंदिरातील पुजारी कुश शर्मा याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले आणि दोघांमध्ये मोबाईलवरून नियमित संवाद सुरू झाला. पुजारी कुश शर्मा हा कधी कधी विद्यार्थिनीच्या आईच्या मोबाईलवरही फोन करून बोलत असल्याने कुटुंबीयांनाही त्याच्याबाबत फारसा संशय वाटला नाही.
नेमकी घटना काय?
आरोप आहे की, मैत्री वाढल्यानंतर पुजाऱ्याने विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. मंदिर परिसरात असलेल्या स्वतःच्या खोलीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला, असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, 18 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 1 वाजता आरोपी पुजारी कुश शर्मा याने तिला मेसेज करून घराबाहेर भेटण्यास बोलावले. आरोपीच्या बोलण्याला बळी पडून रात्री सुमारे 2 वाजता घरातील सर्व सदस्य झोपले असताना ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. त्या वेळी आरोपी रस्त्यावर उभा होता. त्याने तिला आपल्या खोलीत नेले आणि तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
हे ही वाचा>> बॉयफ्रेंड अन् प्रेयसीचे बाथरुममध्ये शरीरसंबंध, मुलगी बेशुद्ध पडली, रक्तस्त्राव सुरू अन्...
इतकेच नव्हे तर या घटनेची कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप आहे. घटनेनंतर विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत घरी परतली. काही काळानंतर तिने धैर्य एकवटून आपल्या आई व भावाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला अकोदिया पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी पुजारी कुश शर्मा याला अटक केली.
या प्रकरणाबाबत माहिती देताना शुजालपूर उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओपी) निमेष देशमुख यांनी सांगितले की, अकोदिया येथील 17 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या आई व भावासह पोलीस ठाण्यात आली होती. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुश शर्मा हा अकोदिया रेल्वे स्थानकासमोर असलेल्या हनुमान मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असून, तो मंदिर परिसरातील घरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत तसेच अल्पवयीन मुलींच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
1 महिनाभर तरुणीला ठेवलं हॉटेलमध्ये, मित्रांना तिथे बोलायवायचा अन्... तरुणीची झाली भयंकर अवस्था
ADVERTISEMENT











