Crime News: उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला मादक पेय प्यायला दिलं आणि नंतर तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. इतकेच नव्हे तर, तिच्या अश्लील फोटो आणि व्हिडीओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे. आता, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव शाहरुख असून तो शास्त्रीनगरचा रहिवासी आहे. 2025 मध्ये त्याने नोकरी देण्याच्या बहाण्याने पीडितेला आपल्या कार्यालयात बोलवलं आणि त्यावेळी तिला कोल्ड्रिंगमध्ये मादक पदार्थ मिसळून प्यायला दिलं. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेला शुद्ध आल्यानंतर, ती निर्वस्त्र अवस्थेत दिसली. दरम्यान, आरोपीने तिला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
हे ही वाचा: यवतमाळ: शाळेच्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केल्याचा आरोप... भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!
पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध...
समाजात बदनामीच्या भितीने पीडिता गप्प राहिली पण याचा फायदा उचलून आरोपीने तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तो सतत तिला धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. दरम्यान, आरोपीने तिच्याकडे पैशांची मागणी केली आणि धमकी देऊन महिलेकडून तब्बल 6.25 लाख रुपये लुबाडले. पैसे उकळल्यानंतर, आरोपी तरुण पीडितेवर तिची संपत्ती विकण्यासाठी दबाव आणत होता. आता, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा: मुंबई: मॅट्रिमोनियल साइटवर पाठवली रिक्वेस्ट; IPS अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा अन्... घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये आरोपीने तिला एका कॉलनीमध्ये नेलं आणि बळजबरीने तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, महिलेने विरोध केल्यानंतर, तिला शिवीगाळ आणि मारहाण सुद्धा करण्यात आल्याचा आरोप तिने केला. त्यावेळी, तिने 112 डायल करून पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना पोलीस ठाण्यात नेलं पण त्यानंतर काहीच कारवाई झाली नसल्याचं ती म्हणाली. तसेच, आरोपी तरुणाने तिच्या पतीला फोन करून पीडितेला घटस्फोट देण्याची धमकी दिली. या धमक्यांमुळे महिलेच्या वैवाहिक जीवनात मतभेद झाल्याचा आरोप तिने केला. आता, पीडितेने पोलिसांकडे तिला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT











