मतदानाला EVM वर उमेदवाराचं नाव अन् मतमोजणीच्या दिवशी गायब, तरीही निकाल जाहीर... 7 कर्मचारी तडकाफडकी निलंबित

भंडारा नगर परिषद निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी EVM वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचे नाव गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे 7 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.

name of ncp sharad pawar party candidate is missing from evm machine 7 employees have been suspended immediately

प्रातिनिधिक फोटो

मुंबई तक

23 Dec 2025 (अपडेटेड: 23 Dec 2025, 09:35 AM)

follow google news

भंडारा: भंडारा नगर परिषद निवडणुकीदरम्यान EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रक्रियेत मोठा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव EVM मशीनवरच दिसले नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली.

हे वाचलं का?

काय आहे पूर्ण प्रकरण?

निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान ही बाब समोर आली की, उमेदवाराचे नाव EVM मध्ये नसल्याने त्या प्रभागात मोठा गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ निवडणूक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलली. प्रभाग 3 मधील मतदान प्रक्रियेवर परिणाम झाल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला.

हे ही वाचा>> 'कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर...', पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

प्रशासनाची मोठी कारवाई

  • 7 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
  • 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. जो कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा>> कल्याणात धुमशान, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आधी एकमेकांचं काढलं रक्त... तासाभरातच दोघांचे गळ्यात गळे!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, "ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाईची मागणी करत आहोत."

मतदानाच्या दिवशी उमेदवाराचं नाव, मतमोजणीच्या दिवशी EVM वरून नाव गायब

या घटनेमुळे भंडारा नगर परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी  NCP शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी असं म्हटलं की, 'या प्रकारवर आमच्या उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतला. ही बाब नोडल अधिकाऱ्यांना देखील माहीत पडली. पण त्यानंतर देखील निवडणुकीचा निकाल रोखला नाही. जेव्हा मतदान झालं त्या दिवशी मशीनवर करूणा राऊत यांचं नाव होतं. नोटाचा पर्यायही होता. पण मतमोजणीच्या दिवशी करूणा राऊत यांचं नाव मशीनवर नव्हतं. तसंच नोटाचा पर्यायही दिसत नव्हता. असं असतानाही या प्रभागातील मतमोजणी पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात आला.'

'या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत कठोर चौकशी झाली पाहिजे. यात जर नोडल अधिकारी, रिटर्निंग ऑफिसर किंवा तहसीलदार जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.' असंही चरण वाघमारे यावेळी म्हणाले.

    follow whatsapp