एकनाथ शिंदेंच्या गटातून दुसरा आमदार निसटला; मी उद्धव ठाकरेंचाच म्हणत केले गंभीर आरोप

मुंबई तक

• 07:57 AM • 22 Jun 2022

योगेश पांडे नागपूर: शिवसेनेच्या माजी गटनेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत गुजरात गाठले, त्यानंतर गुवाहटी. ४० आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. परंतु आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या गटात कालपर्यंत असलेले नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आज नागपूरमध्ये परतले आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे

हे वाचलं का?

नागपूर: शिवसेनेच्या माजी गटनेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत गुजरात गाठले, त्यानंतर गुवाहटी. ४० आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. परंतु आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या गटात कालपर्यंत असलेले नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आज नागपूरमध्ये परतले आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी धक्कादायक विधान केले आहे.

”मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझी तब्येत चांगली आहे. मला तिथल्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि म्हणाले तुमच्यावर कारवाई करायची आहे. परंतु तेव्हा माझी तब्येत ठीक होती. मला हृदयविकाराचा झटका आला ही बातमी खोटी होती. वीस-पंचवीस लोकांनी मला जबरदस्ती इंजेक्शन दिले. मला माहिती नव्हतं माझ्या शरीरावर चुकीच्या प्रक्रिया करण्याचं त्या लोकांच षडयंत्र होतं” असा धक्कादायक आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान काल उस्मानाबादच्या कळंबचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदेंच्या गटातून पळून आल्याचे त्यांनी सांगितले होते. शिंदेंनी त्यांना कशापद्धतीने गुजरातच्या सिमेपर्यंत नेले याचा संपुर्ण कथानक त्यांनी सेना प्रमुखांना सांगितला. काल त्यांनी शिंदेंच्या गटातून धूम ठोकून थेट मातोश्री गाठली होती. मला वॉशरुमला थांबायचे आहे असे सांगून कैलास पाटील गाडीतून घाली उतरले आणि पळत सुटले. गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरुन त्यांनी कधी पायी, कधी दुचाकीवरुन लिफ्ट घेत तर कधी ट्रकमधून मुंबई गाठली होती.

एकनाथ शिंदे म्हणाले गर्व से कहो हम हिंदू है

“आम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार पुढे घेऊन जात आहोत.”

“जय महाराष्ट्र, गर्व से कहो हम हिंदू है, हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही कधीही तडजोड करणार नाही. सत्तेसाठीही तडजोड करणार नाही. आम्ही शिवसेना सोडणार नाहीये,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार म्हणाले, “गर्व से कहो हम हिंदू है. आम्ही शिवसैनिक आहोत आणि एकनाथ शिंदे जे सांगतील ते आम्ही करू. आम्ही आनंदी आहोत.”

    follow whatsapp