जुनी पेट्रोल स्कूटर होणार इलेक्ट्रिक, पाहा कसं…

बंगळुरुमधील काही स्टार्टअप कंपन्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरमध्ये काही बदल करुन त्या इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी जास्त पैसे देखील खर्च करण्याची आवश्यकता नाही. तसंच एक कंपनी तर हायब्रीड स्कूटर देखील तयार करुन देत आहे. स्टार्टअप कंपनी बाउन्सने अशीच एक स्कीम सुरु केली आहे. यासाठी ते फक्त 20 हजार रुपये आकारत आहेत. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:49 PM • 29 Aug 2021

follow google news

हे वाचलं का?

बंगळुरुमधील काही स्टार्टअप कंपन्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरमध्ये काही बदल करुन त्या इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यासाठी जास्त पैसे देखील खर्च करण्याची आवश्यकता नाही. तसंच एक कंपनी तर हायब्रीड स्कूटर देखील तयार करुन देत आहे.

स्टार्टअप कंपनी बाउन्सने अशीच एक स्कीम सुरु केली आहे. यासाठी ते फक्त 20 हजार रुपये आकारत आहेत.

जुन्या पेट्रोल स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि एक बॅटरी लावून कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवून देत आहे.

बाउन्स या कंपनीने आतापर्यंत एक हजाराहून जास्त पेट्रोल स्कूटर्सला इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून तया केल्या आहेत.

या स्कूटरमध्ये जी बॅटरी येते ती एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 65 किमीपर्यंत चालू शकते. असा कंपनीचा दावा आहे.

दरम्यान, Meladath ही कंपनी एक असं किट आणणार आहे की, ज्यामुळे जुनी स्कूटर इलेक्ट्रिक हायब्रिड स्कूटर म्हणून तयार होईल.

ही स्कूटर पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कोणत्याही मोडवर वापरता येणार आहे.

पेट्रोलचे वाढते दर यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक स्कूटरला पसंती देतात. या हायब्रिड स्कूटरसाठी 40 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

ओला, हीरो, सिंपल एनर्जीसारख्या अनेक कंपन्यांनी बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरच्या जबरदस्त मॉडेल आणले आहेत.

    follow whatsapp