उस्मानाबाद : डान्सबारवर छापा, २५ महिलांसह ६४ पुरुष ताब्यात

मुंबई तक

• 02:57 PM • 29 Nov 2021

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे पोलिसांनी धडक कारवाई करत एका डान्सबारवर कारवाई केली आहे. नळदुर्ग रोडवरील हॉटेल गजगावर उस्मानाबाद पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत २५ महिलांसह ६४ पुरुष, दोन मॅनेजर आणि मालकाला अटक केली आहे. उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने ही कारवाई करण्यात आली. कळंब विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश, पोलीस निरीक्षक […]

Mumbaitak
follow google news

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे पोलिसांनी धडक कारवाई करत एका डान्सबारवर कारवाई केली आहे. नळदुर्ग रोडवरील हॉटेल गजगावर उस्मानाबाद पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत २५ महिलांसह ६४ पुरुष, दोन मॅनेजर आणि मालकाला अटक केली आहे.

हे वाचलं का?

उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने ही कारवाई करण्यात आली. कळंब विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश, पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी कोविड -19 संबंधीत प्रशासकीय मनाई आदेशाचे उल्लंघन होत असून 25 नृत्यागणासह 64 ग्राहक बीभत्स हावभाव करत असल्याचे व विदेशी दारूच्या अवैध साठ्यासह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Mumbai Airport वर I Phone चं स्मगलिंग रॅकेट उध्वस्त, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

अटक करण्यात आलेल्या सर्व महिला या परराज्यातल्या असल्याचं कळतंय. याचदरम्यान अटक करण्यात आलेले पुरुष हे गुलबर्गा, कर्नाटक, सोलापूर या भागातून आल्याचं कळतंय. डान्सबारमध्ये बीभत्स वर्तन करणे यासह रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरु ठेवणे यासह इतर कारणामुळे कारवाई करण्यात आली आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 294,208,268,269,188 , यासह महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह बार रूम मधील अशिशील प्रतिबंध कायदा कलम 8 सह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    follow whatsapp