राष्ट्रपतींची दृष्ट काढणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या ट्रान्सवुमन मंजम्मा जोगतींची गोष्ट

मुंबई तक

• 12:10 PM • 10 Nov 2021

नुकताच पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यातला एक पुरस्कार हा सगळ्यांच्या लक्षात राहिला आहे. एवढंच नाही तो पुरस्कारही तितकाच खास होता. सोशल मीडियावर या पुरस्काराचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुरस्कार देत असताना ट्रान्सवुमन मंजम्मा जोगती यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या पुरस्कार घेण्यासाठी आल्या त्यावेळी त्यांनी पारंपरिक पद्धतीने […]

Mumbaitak
follow google news

नुकताच पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यातला एक पुरस्कार हा सगळ्यांच्या लक्षात राहिला आहे. एवढंच नाही तो पुरस्कारही तितकाच खास होता. सोशल मीडियावर या पुरस्काराचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुरस्कार देत असताना ट्रान्सवुमन मंजम्मा जोगती यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या पुरस्कार घेण्यासाठी आल्या त्यावेळी त्यांनी पारंपरिक पद्धतीने राष्ट्रपतींची पदराने दृष्ट काढली. त्यामुळे ते क्षण उपस्थितांसाठी लक्षवेधी ठरले.

हे वाचलं का?

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मंजम्मा जोगती यांनी पारंपारिक पद्धतीने राष्ट्रपतींना आशीर्वाद दिले. याचा व्हीडिओ एएनआयनं ट्विट केला आहे.

विविध स्त्री देवतांच्या स्तुतीसाठी इतर कला प्रकार, जनपद गाणी, कन्नड भाषेतील सॉनेटमध्येही प्रभुत्व मिळवले.या कामगिरीसाठी मंजम्मा यांना 2010 मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये त्यांना कर्नाटक जनपद अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2019 मध्ये त्यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासह, त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर ठरल्या.

72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारने नृत्य क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली होती.

कोण आहेत मंजम्मा जोगती?

जोगती नृत्य, जनपद गीत आणि इतर कलाप्रकार टिकवून ठेवण्यासाठी मंजम्मा जोगती या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये जोगती नृत्य आणि जनपद गीतांची परंपरा अजूनही सुरु आहे.

मंजम्मा जोगती यांना सन 2006 मध्ये कर्नाटकातील जनपद अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर सन 2010 मध्ये कर्नाटक सरकारच्यावतीनं त्यांचा वार्षिक कन्नड राज्योत्सव पुरस्कारानं गौरवही करण्यात आला आहे. ही कला आणि संस्कृती शिकून तिचं संवर्धन करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या समाजाला केलं आहे.

आपल्या देशात एक काळ असा होता की तृतीयपंथीय म्हटलं की लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघायचे. त्यांच्याबाबत तिरस्कारच नजरेत असायचा. आता मात्र चित्र ते नाही खूपच आश्वासक आहे. मंजम्मा यांना मिळालेला पुरस्कार हेच सांगून जातो आहे.

    follow whatsapp