मुंबईतील NCB अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक

मुंबई तक

• 07:49 AM • 08 Oct 2021

मुंबईतल्या NCB च्या अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही महिली हैदराबादहून पुण्याला जात होती. त्यावेळी मुंबईतल्या एनसीबी अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केला असं या महिलेने म्हटलं आहे. या महिलेने केलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी मुंबईतल्या एनसीबी अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव दिनेश चव्हाण असे आहे. तो नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी राहतो. […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या NCB च्या अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही महिली हैदराबादहून पुण्याला जात होती. त्यावेळी मुंबईतल्या एनसीबी अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केला असं या महिलेने म्हटलं आहे. या महिलेने केलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी मुंबईतल्या एनसीबी अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव दिनेश चव्हाण असे आहे. तो नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी राहतो. मागील काही दिवसांपासून तणावात असल्याने तो सुट्टीवर आहे असंही कळतंय.

हे वाचलं का?

ड्रग्ज प्रकरणात जी कारवाई झाली त्या प्रकरणात या अधिकाऱ्याचा कोणताही सहभाग नव्हता असेही एनसीबी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उपचार घेत असताना वैद्यकी रजेवर असलेल्या दिनेश चौहावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे अशी माहिती औरंगाबादचे एस.पी. जीआरपी एम. पाटील यांनी दिली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई NCB ने म्हणजेच अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने केली आहे. ही कारवाई 2 ऑक्टोबरला झाली. त्यानंतर गुरूवारी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB ची ही कारवाई म्हणजे बनाव असल्याचं म्हटलं आहे. तसंच नवाब मलिक यांनी हेदेखील सांगितलं की उद्या ते त्या क्रूझवर भाजप नेत्याचा मेहुणा आहे. मी त्याचं फुटेज उद्या दाखवणार असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे एनसीबीने हे सगळे आरोप खोडून काढले आहेत. आर्यन खानवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे NCB चर्चेत आहे. अशात NCB च्या एका अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

    follow whatsapp