बलात्कार प्रकरणातील आरोपीचे पाय धुतानाचे व्हिडीओ व्हायरल, आता रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण, काय म्हणाल्या?

Rupali Chakankar on Nashik Rape case Accused Captain Ashok Kharat : मिळालेल्या माहितीनुसार, एका 35 वर्षीय महिलेने अशोक खरात विरोधात तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अशोक खरात हे रुपाली चाकणकर यांचे अध्यात्मिक गुरु असल्याचंही समोर आलं होतं.

 Rupali Chakankar on Nashik Rape case Accused Captain Ashok Kharat

Rupali Chakankar on Nashik Rape case Accused Captain Ashok Kharat

मुंबई तक

18 Mar 2026 (अपडेटेड: 18 Mar 2026, 03:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बलात्कार प्रकरणातील आरोपीचे पाय धुतानाचे व्हिडीओ व्हायरल

point

आता रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण, काय म्हणाल्या?

Rupali Chakankar on Nashik Rape case Accused Captain Ashok Kharat ,नाशिक : स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणारा आणि राजकीय वर्तुळात वावर असलेला अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' खरात याला नाशिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. या कारवाईमुळे नाशिकसह राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एका 35 वर्षीय महिलेने अशोक खरात विरोधात तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर कॅप्टन खरात यांचा राजकीय व्यक्तीसोबत असलेला वावर समोर येऊ लागला. ते अनेक नेत्यांचे अध्यात्मिक गुरु असल्याचं समोर आलं. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तर चक्क त्यांचे पाय देखील धुतले होते. याबाबतचे व्हिडीओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर सनसनाटी आरोप केले. चारीबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर रुपाली चाकरणकर यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय. 

हे वाचलं का?

रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण 

रुपाली चाकरण म्हणाल्या, "शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे."

सुषमा अंधारेंचे सनसनाटी आरोप, फेसबुक पोस्ट जशीच्या तशी 

"रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली…..कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत.  पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे.. अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे,  स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. 

विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष; खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत...! योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत.  महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे...? "

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अल्पवयीन मुलाचे मुलीशी अश्लील चाळे, ग्रामस्थांच्या आरोपानं खळबळ, खांबाला बांधून मारहाण करत व्हिडिओ रेकॉर्ड केले

    follow whatsapp