Vidhan Parishad Election Result Live Update : विधानपरिषदेच्या 17 जांगाचे निकाल एका क्लिकवर

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 10:45 AM)

Vidhan Parishad Election Result Live Update : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांपैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध निवडून आणल्या होत्या. त्यामुळे 18 जून रोजी 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

Vidhan Parishad Election Result Live Update

Vidhan Parishad Election Result Live Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महायुतीचा 6 जागांवर विजय

point

मतमोजणीला सुरुवात

Vidhan Parishad Election Result 2026 : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.  यातील 17 पैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध निवडून आणल्या आहेत. उर्वरित 11 जागांसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आज या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निकालाची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. 

हे वाचलं का?

महायुतीच्या बिनविरोध जागा 

1. विदर्भाची जागा                   :  अरुण लखाणी                        भाजप 

2. पुणे                                  : विक्रम काकडे                        अजित पवारांची राष्ट्रवादी 

3. ठाणे                                 :  रवींद्र फाटक                         भाजप 

4. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग      : अनिकेत तटकरे                    अजित पवारांची राष्ट्रवादी

5. यवतमाळ                          :दुष्यंत चतुर्वेदी                         शिवसेना शिंदे गट

6  अहिल्यानगर                      : प्राजक्त तनपुरे                        भाजप 

महायुतीने 6 जागा बिनविरोध निवडून आणल्याने उर्वरित 11 जागांसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागतो? जाणून घेणार आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

नागपूर विधानपरिषद निकाल 

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणुक 

भाजप उमेदवार डॉ राजीव पोतदार विजयी.. अधिकृत घोषणा बाकी. 

एकूण झालेलं मतदान - 823

डॉ. राजीव पोतदार यांना मिळालेली मते 682

कांग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांना 130

अवैध मत 11

नांदेड विधानपरिषद निकाल 

भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजुरकर 339 मतांनी विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार  कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 समाधान मानावे लागले. एकूण 451 जणांनी केले होते मतदान

धाराशिव विधानपरिषद निकाल 

भाजप उमेदवार बसवराज पाटील यांचा दणदणीत विजय 

845  मतांसह बसवराज पाटील विजयी, सूत्रांची माहिती

महाविकास आघाडीच्या मतालाही धक्का 

काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांना 124 मत, 14 बाद झाल्याची माहिती 

14 मतपत्रिका कोऱ्या असल्याची माहिती

सोलापूर विधानपरिषद निकाल 

- भाजपचे राजेंद्र राऊत विजयी 

- राजेंद्र राऊत यांना 483 मते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वसंत देशमुख यांना 118 मते 

- राजेंद्र राऊत 483 मतांनी विजयी 

- 13 मते बाद

धाराशिव विधानपरिषद निकाल 

भाजप उमेदवार बसवराज पाटील यांचा दणदणीत विजय 

845  मतांसह बसवराज पाटील विजयी, सूत्रांची माहिती

महाविकास आघाडीच्या मतालाही धक्का 

काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांना 124 मत, 14 बाद झाल्याची माहिती 

14 मतपत्रिका कोऱ्या असल्याची माहिती

नाशिक विधानपरिषद  निकाल 

गोकुळ गीते यांना  357 मते - भाजपचे बंडखोर 
नरेंद्र दराडे यांना  248 मते  - शिंदेंची शिवसेना 

109 मतांनी विजयी गोकुळ गीते

जळगाव विधानपरिषद निवडणूक 

नंदकिशोर महाजन  - 582 मते - भाजप - विजयी 
शरद शामराव तायडे -  17 मते - ठाकरे गट 

परभणी विधानपरिषद निकाल 

शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान विजयी!

242 - सईद खान यांना मत (शिवसेना)
159 - डॉ. विवेक नावानंदर (उबाठा)
56 - सुशिल देशमुख (अपक्ष)
8 - मत बाद

 एकूण 464 मते

सातारा - सांगली विधानपरिषद निकाल 

सांगली–सातारा विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीत उमेदवार क्रमांक 1 असलेल्या धैर्यशील कदम यांना 591 मते मिळाली, तर उमेदवार क्रमांक 2 अभयसिंह जगताप यांना 294 मतांवर समाधान मानावे लागले.

अमरावती विधानपरिषद निकाल 

भाजपाचे उमेदवार प्रवीण कोटी पाटील यांना 390 मते, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव 

भंडारा गोंदिया विधानपरिषद निकाल

भंडारा –गोंदिया भाजपचे – अविनाश ब्राह्मणकर विजयी 

छत्रपती संभाजीनगर विधानपरिषद निकाल 

भाजपचे  सुहास शिरसाट विजयी