Shiv Sainiks letter to Omraje Nimbalkar : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आपल्या खासदाराच्या पक्षांतराविरोधात एक अत्यंत भावनिक आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षबदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. खासदार ओमराजे यांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्राद्वारे शिवसैनिकांनी त्यांना पक्ष न सोडण्याची कळकळीची विनंती केली असून, या पत्राने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
ADVERTISEMENT
या पत्रात शिवसैनिकांनी अत्यंत टोकदार भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट म्हटले आहे की, "जर खासदारांना 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत मिळणाऱ्या 100 कोटींच्या निधीची खरोखरच गरज असेल, तर ती रक्कम आम्ही स्वतःच्या किडन्या विकून गोळा करून देऊ, पण आपण पक्ष सोडू नका. राजकीय लाभासाठी विचारांशी तडजोड करू नका, अशी साद त्यांनी आपल्या नेतृत्वाला घातली आहे. 40 वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मतदारांचा विश्वासघात होईल, असे कोणतेही कृत्य करू नका", अशी भावनिक हाक त्यांनी दिली आहे..
शिवसैनिकांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं
आम्ही खालील सह्या करणारे उमरगा तालुका पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक आहोत. गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने शिवसेनेचे काम आम्ही अविरतपणे चालू ठेवले आहे. अनेक संकटे पक्षासमार असतानाही आम्ही न डगमगता कोयत्याहो अमिषाला व पदाला बळी न पडता निष्ठावंतपणे शिवसेनेचे काम कसलीही पर्वा न करता करात आहात. परंतु मागील आठवड्यापासून सतत प्रसार माध्यमांवर आपल्या विषयी म्हणजे (आमच्या खासदारावरील) बातम्या ऐकून धक्का बसला आहे. असे ओमदादा करणार नाहीत अशी हमी प्रत्येक विचारपूस करणाऱ्या जनतेस देत आहोत म्हणून आम्ही आपणास खासदार कारण्यासाठी एक रूपयाही न घेता दिवसाची रात्र करून, प्रचार कहान मोठ्या मताधिक्याने निवडून आणलो आहोत. त्यामुळे सहाजिकच आमचा हक्क तुमच्यावर आहे म्हणून आपणास विनंती करण्यासाठी हा पत्राचा प्रपंच......आमची आपणास नम्र विनंती आहे की, आपणास धाराशिव मतदान संघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून मतदान केलेल्या 6 लाख मतदारांचा अपमान होईल असे कृत्य आपल्याकडून होणार नाही. तसेच आपल्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या शिवसैनिक, काँग्रेस कार्यकते, व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते (शरद पवार गट) यांचा विश्वासघात आपणाकडून होणार नाही ही अपेक्षा.
परंतु आपणा विषयी विविध प्रसारमाध्यमे व सत्ताधारी कार्यकर्ते हे आपल्या विषयी अनेक आरोप लावत आहेत. आम्हास खालील आरोप ऐकण्यात येत आहेत.
1. आपणास पक्षांतरासाठी "ऑपरेशन टायगरमध्ये सामील होण्याबाबत प्रत्येकी 100 कोटी मिळणार आहेत. यासंबंधी आमची विनंती आहे की, आपणाकडून असे कृत्य होणार नाहीत. जर 100 कोटीची आपणास गरंज असेल तर आम्ही खालील सह्या करणारे शिवसैनिक आमच्या किडन्या विकून 100 कोटी रूपये जमा करून देऊ.
2. "ऑपरेशन टायगर " अंतर्गत फुटणाऱ्या प्रत्येक खासदारासाठी 1000 कोटी रूपयेचा निधी देणार आहेत. आम्ही आपणास अश्वासीत करू इच्छितो की, आम्ही कोणताही निधी आपणास मागणार नाही. स.न. 2029 पर्यंत जर निधी अभावी विकास होत नसेल तर आम्ही प्रत्येक मतदाराच्या व जनतेच्या घरोघरी जाऊन पाया पडून तुमच्याकडे जनतेची कोणत्याच प्रकारची तक्रार येऊ देणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ.
3. आपण शिवसेना परिवारातील निष्ठावंत, संघर्षशिल आणि जनतेच्या सुख-दुखात सहभागी होणारे नेतृत्व आहात.
कठीण काळात जेंव्हा अनेकांनी साथ सोडली तेव्हा आपण ठाम पण पक्ष आणि शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहीलात त्यामुळेच लाखो शिवसैनिकांच्या मनात आपल्या विषयी विशेष आदर आणि प्रेम आहे. आज पक्षांतराच्या चर्चामुळे सामान्य शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. आपल्या एका निर्णयामुळे हजारों कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
आम्ही सत्ता, पद किवा लाभासाठी नव्हे, तर विचारासाठी निष्ठेसाठी लढणारे शिवसैनिक आहोत, आपण ठाकरे कुटुंबाच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या निष्ठेशी कायम रहावे, हीच उमरगा-लोहारा तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांची मनापासून विनंती आहे. सद्यस्थितीत पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांची प्रकृती नाजुक आहे. त्यांना त्रास हाईल असे वर्तन आपल्याकडून होणार नाही अशी अपेक्षा, मा. बाळासाहेबांनी आपली शेवटीची ईच्छा व्यक्त केली होती उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना सांभाळा त्यांच्या विधानास आम्ही कायमस्वरूपी बांधील आहोत आपणही रहावे हीच इच्छा..
ADVERTISEMENT











