'Operation Tiger देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनात झालं', भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

BJP MLA Rajendra Raut on operation tiger : ‘ऑपरेशन टायगर’ हे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालीच पार पडल्याचा दावा भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. विजय मिळाल्यानंतर त्यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला.

BJP MLA Rajendra Raut

BJP MLA Rajendra Raut

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 12:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'Operation Tiger देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनात झालं'

point

भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

BJP MLA Rajendra Raut on operation tiger : "ऑपरेशन टायगर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी हे ऑपरेशन केलं. हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही चर्चेला बसू. त्यांच्या सूचनेनुसार पुढची पाऊले उचलण्यात येतील", असा गौप्यस्फोट भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत केला. त्यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदेसेनेतील प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. ते सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Vidhan Parishad Election Result Live Update : विधानपरिषदेच्या 17 जांगाचे निकाल एका क्लिकवर

राजेंद्र राऊत यांनी आपल्या विजयामागील मतदारांचा विश्वास आणि गेल्या काही वर्षांतील कामगिरी यांचाही उल्लेख केला. विधानसभेच्या निवडणुकीवेळी काही प्रतिकुल घटना घडल्या असल्या तरी बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा विविध निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवत मोठे मताधिक्य दिल्याचा उल्लेख करत त्यांनी हा विजय संपूर्ण जिल्ह्याच्या इच्छेचा आणि आशीर्वादाचा परिणाम असल्याचे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात केलेल्या कामामुळेच कार्यकर्त्यांनी आपल्याला विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.

'कोणाच्या दारात जाऊन राजकारण करण्याची गरज नाही'

यावेळी त्यांनी विरोधकांवरही थेट टीका केली. काही जणांकडून दहशतीचे राजकारण करण्यात आले, तसेच एका सामान्य कार्यकर्त्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. मात्र जनतेने त्याला योग्य उत्तर दिल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सर्व पक्षांतील कार्यकर्ते आणि नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता, असे सांगताना राऊत यांनी निवडणुकीच्या आधीपर्यंत अनेकांशी आपले संबंध चांगले होते, असेही नमूद केले. विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी कोणाच्याही दारात जाऊन राजकारण करण्याची गरज नसल्याचे सांगितले आणि लोकशाहीत प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळतो, असे मत व्यक्त केले.

हेही वाचा : मोहिते पाटलांवर बरसले, अकलूजमध्ये सभा ठरली; विजयानंतर राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया

'दडपशाहीचे राजकारण सोडून लोकांमध्ये जाऊन काम करणार' 

भविष्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील योजनांबाबत बोलताना राऊत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दूध संघ आणि इतर संस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांची बँक अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. बँकेच्या ठेवी वाढवण्यात आपला वाटा असल्याचा दावा करत त्यांनी स्वतःवर झालेले आरोप फेटाळले. जिल्ह्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा ताई आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. बार्शीमध्ये ज्या पद्धतीने विकासकामे करण्यात आली, त्याच धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात विकासाचा आराखडा राबविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांना सल्ला देताना त्यांनी दडपशाहीचे राजकारण सोडून लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे आवाहन केले.