Omraje Nimbalkar praises Eknath Shinde, धाराशिव, गणेश जाधव : खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून शिवसेना शिंदे गटात जाणार असून ते लवकरच निर्णय जाहीर करू शकतात. कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. निर्णय झाला, घोषणा बाकी असून 'खिचके के ताण धनुष्यबाण' अशी स्तिथी आहे. ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. शिवाय, कार्यकर्त्यांनी पाठीशी उभे राहत साथ द्यावी, अशी विनंतीही केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे: आयशर टेम्पोनं दुचाकीला चिरडलं, चिमुरड्यासह दोघांचा दुर्दैवी अंत
पाटील कुटुंब सत्ता असेल तिकडं जातं - ओमराजे निंबाळकर
ओमराजे निंबाळकर म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था निवडणुका लढवल्या मात्र त्यात यश आले नाही. सत्तेची व आर्थिक ताकत ही त्यांच्या सोबत (पाटील कुटुंब) आहे. आपण ज्यांना विरोध करण्यासाठी राजकारणात आलो ते काँग्रेस सरकार असताना तिथे होते, भाजप सरकार आले की तिथे आले आहेत, त्यांचं चालूच आहे. आपण कमी संसाधनात कुठेपर्यंत लढायचे? आपण सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमन केले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. बऱ्याच कार्यकर्त्यांसोबत माझी याची चर्चा झाली.
हेही वाचा : किडन्या विकून 100 कोटी देऊ, पण पक्ष सोडू नका; ओमराजे निंबाळकरांना कोणी लिहिलं पत्र?
भाजप शिवसेनेसह 4 पक्ष चालवत आहे - निंबाळकर
शेतकरी याचा साधा ट्रान्सफर दुरुस्त करायचा असेल तर निधी नाही, दर वर्षी इस्टीमेट तयार करायचे पण निधी नाही. पाटील परिवार सत्तेत आहे, स्वतः आमदार, पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे. आपण वेड्यासारखं बघत राहायचे आपण सुद्धा सत्तेतील नेतृत्व स्वीकारले पाहिजे. भाजप शिवसेनेसह 4 पक्ष चालवत आहे, या सगळ्या बाबीचा विचार करावा लागेल. कार्यकर्त्यांची बिले अडवली जात आहे, असंही निंबाळकरांनी नमूद केलं.
पवनराजे साहेबांच्या केसमध्ये 20 वर्षानंतर सगळेच निर्दोष आहेत, कोर्ट म्हणत आहे की राजकीय शत्रूत्व आहे. उद्देश आहे पण सगळे निर्दोष. मी स्वतः खासदार असताना मी माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तर इतरांचे काय ? प्रत्येक जण म्हणत आहे, तुमची प्रतिमा व महाराष्ट्रात नाव आहे. मी प्रतिमा सांभाळायला खासदार बनलो आहे का, या लोकांना धडा शिकवण्यासाठी झालो आहे. निकाल विरोधात गेल्यावर एकनाथ शिंदे हे तात्काळ गृहमंत्री यांना बोलले, मला पाठबळ दिले. निकाल लावायसाठी गेलो नाही, अशा शब्दात ओमराजेंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.
साध्या साध्या गोष्टी होत नाहीत, मी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी राहा, तुमची त्यासाठी नितांत गरज आहे अशी विनंती केली. जिल्हा परिषद, नगर परिषद सारखे लोकसभा व विधानसभावेळी झाले तर त्यांचीच सत्ता येईल. अनेक जण म्हणतात की मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का ? मी मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे त्यासाठी निर्णय घेत आहे. माझी भूमिका तडजोडीची कधीही राहणार नाही, त्या कुटुंबाला मतदान करा असे मी म्हणणार नाही, त्यांच्यासाठी मत मागणार नाही, असा निर्धारही ओमराजेंनी बोलून दाखवला.
ADVERTISEMENT











