कोरोना लसीच्या पुरवठ्यावरुन नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा

मुंबई तक

• 02:45 AM • 04 Jun 2021

कोरोनाविरुद्ध लढ्यात लसीच्या पुरवठ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या Vice President कमला हॅरिस यांच्यात चर्चा झाली आहे. कोरोनाविरुद्ध लढाईत अमेरिका भारताला लसींचा पुरवाठा करणार असल्याबद्दल मोदींनी कमला हॅरिस यांचे आभार मानले. Spoke to @VP Kamala Harris a short while ago. I deeply appreciate the assurance of vaccine supplies to India as part of the US […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाविरुद्ध लढ्यात लसीच्या पुरवठ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या Vice President कमला हॅरिस यांच्यात चर्चा झाली आहे. कोरोनाविरुद्ध लढाईत अमेरिका भारताला लसींचा पुरवाठा करणार असल्याबद्दल मोदींनी कमला हॅरिस यांचे आभार मानले.

हे वाचलं का?

Stratagy for Global Vaccine Sharing या उपक्रमाअंतर्गत अमेरिका आपल्या सहयोगी देशांना लसींचा पुरवठा करणार आहे. या विषयाबद्दल मोदी आणि हॅरिस यांच्यामध्ये चर्चा झाली. “दरम्यानच्या काळात अमेरिकेने भारताला केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांचे आभार मानले”, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी कोरोनाच्या काळात वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्च्या मालाचा सप्लाय यावरही चर्चा झाली. कोरोनामुळे जगात निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणा आली की भारतात जरुर या अस आमंत्रण नरेंद्र मोदींनी कमला हॅरिस यांना दिलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घोषणा केली आहे की अमेरिका जून महिन्याच्या अखेरीस लसींचे ८ कोटी डोस निर्यात करणार आहे. पहिल्या टप्प्यात अमेरिका अडीच कोटी डोस निर्यात करणार आहे. ज्यातील ७५ टक्के डोस हे विविध देशांमध्ये तर उरलेले डोस हे जिथे कोरोनाचे आकडे सातत्याने वाढत आहेत अशा भारत, मेक्सिको, कॅनडा, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये पाठवले जाणार आहेत.

    follow whatsapp