मोठी बातमी : सोलापूर-पुणे महामार्ग बंद, महापूरामुळे प्रवाशांचे हाल; पुलांखाली पाणी आल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune Solapur highway closed : सीना नदीला महापूर आल्याने पुणे-सोलापूर महामार्ग बंद करण्याची वेळ आलीये.

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:17 PM • 24 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संपूर्ण मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये.

point

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचं मोठं नुकसान झालंय.

point

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुराच्या पाण्यामुळे अक्षरश: आडवा झालाय.

Pune Solapur highway closed : गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. अनेक छोट्या आणि मोठा नद्यांना देखील महापूर आलाय. त्यामुळे सोलापूरसह मराठवाड्यात अतिवृष्टी झालीये. अनेक तालुक्यांत पाऊसाने 65 मिलीमीटर पावसाचा टप्पा गाठलाय. दरम्यान, पुणे- सोलापूर महामार्गावरील अनेक पुलांखाली पाणी आलीये. मोठे पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सोलापूर-पुणे महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतलाय. महामार्ग बंद केल्यानंतर केल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. 

हे वाचलं का?

सीना नदीचं रौद्ररूप, शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल 

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीने रौद्र रुप धारण केलंय. शिवाय,बार्शी तालुक्यातील चांदणी, नागझरी या नद्यांना देखील पूर आलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी चॉपरचा वापर करावा लागला होता. शिवाय शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली होती. 

हेही वाचा : 5 लाखांहून अधिकचा खर्च येणाऱ्या 9 दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी निधी मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय

माढ्या तालुक्यातील अनेक गावं सध्या पाण्याखाली गेली आहे. शिवाय, रिधोरे येथील ब्रिटीश कालीन पूल आणि अन्य काही पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे प्रशासनाला महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांवर या महापूरामुळे मोठं संकट ओढावलंय. गेल्या काही महिन्यांपासून शेतात राबत घेतलेली मेहनत अक्षरश: मातीमोल झालीये. 

मराठवाड्यातील महापूराचा प्रवाशांना मोठा फटका बसलाय. अनेक रस्ते पुरामुळे बंद करण्यात आले आहेत. शिवाय, काही रेल्वे देखील उशीरा धावत असल्याचं चित्र आहे. लातूरहून मुंबईकडे जाणारी रेल्वे मंगळवारी रात्री 3 तास उशीराने धावली आहे. नांदेड-पनवेल गाडीला देखील उशीराने धावत होती. 

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे सीना नदीला महापूर आलाय. सीना नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून महामार्गावरील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बॅरीकेट्स लाऊन हा महामार्ग बंद केलाय. मात्र, प्रवाशांना पायी पुढे जाण्याचा परवानगी देण्यात आली आहे. 

हेही वाचा : चंद्रपूर हादरलं! NEET ला होते 99.99 टक्के, 'या' वैद्यकीय महाविद्यालयात मिळाला प्रवेश, तरीही 'त्या' एका कारणावरून तरुणानं केली आत्महत्या

 

    follow whatsapp