चंद्रपूर हादरलं! NEET ला होते 99.99 टक्के, 'या' वैद्यकीय महाविद्यालयात मिळाला प्रवेश, तरीही 'त्या' एका कारणावरून तरुणानं केली आत्महत्या

मुंबई तक

Chandrapur Suicide : राज्यातील चंद्रपूरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने डॉक्टरीकीसाठी नीटची परीक्षा पास होऊनही टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव अनिल बोरकर (वय 19) असल्याचं समजतंय.

ADVERTISEMENT

chandrapur news
chandrapur news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस

point

तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

point

आत्महत्येमागचं कारण काय?

Chandrapur Suicide : राज्यातील चंद्रपूरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने डॉक्टरीकीसाठी नीटची परीक्षा पास होऊनही टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव अनिल बोरकर (वय 19) असल्याचं समजतंय. अनुराग हा नीटची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. तरीही त्याने असं टोकाचं पाऊल उचलल्याचं नेमकं कारण काय? होतं असा अनेकांना प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा : पुणे हादरलं! कोंढव्यात पैशांवरून वाद, घरात घुसून वडिलांना शिवीगाळ, भांडण सोडवणाऱ्या शाळकरी मुलावर सपासप वार

अनुरागसोबत नेमकं काय घडलं?

अनुराग बोरकरने नीट परीक्षेत चांगलं यश मिळवलं होतं. मात्र, त्याने टोकाचं पाऊल का उचललं असेल याबाबतची माहिती आता समोर आली आहे. डॉक्टर व्हायचे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे घडली. अनुराग अनिल बोरकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने सुसाईड नोटमध्येही डॉक्टर व्हायचं नसल्याचं नमूद केलं आणि त्यातूनच खरं कारण आता समोर आलं आहे.

नीट परीक्षेमध्ये 99.99 % टक्के गुण

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये त्याला वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला होता. तो एमबीबीएस प्रवेशासाठी जाणार होता. त्यापूर्वीच त्यानं आपलं जीवन संपवलं होतं. मृत तरुण असलेल्या अनुरागने नीट परीक्षेमध्ये 99.99 % टक्के गुण मिळवले होते. त्याने ओबीसी प्रवर्गातून 1475 वा क्रमांक पटकावला होता. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत केलं जात होतं. पण, त्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. या एकूण घटनेनं चंद्रपूरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपासाचा शोध घेताना दिसतात.

हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशीचे उजळणार नशीब, बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशीतील लोक होणार मालामाल

आत्महत्येचं धक्कादायक कारण

अनुरागचे काही मित्र हे परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणार होते. अनुरागचा नंबर भारतातील सरकारी वैद्यकीय संस्थेत शिक्षण घेण्यासाठी सांगितलं. मात्र, अनुरागला परदेशात जाऊनच शिक्षण घ्यायचं होतं. त्यातूनच त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp