Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?

मुंबई तक

08 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:32 AM)

Rajapur journalist Shashikant Warishe news : रत्नागिरी : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांचा सोमवारी (६ फेब्रुवारी) भीषण अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक केली असून, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र हा अपघात नसून घातपात आहे, जाणूनबुजून केलेला खून आहे, असा आरोप कोकण […]

Mumbaitak
follow google news

Rajapur journalist Shashikant Warishe news :

हे वाचलं का?

रत्नागिरी : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांचा सोमवारी (६ फेब्रुवारी) भीषण अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक केली असून, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र हा अपघात नसून घातपात आहे, जाणूनबुजून केलेला खून आहे, असा आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई अशी मागणीही वालम यांनी केली आहे. (Rajapur journalist Shashikant Warishe died in a horrific accident on Monday (February 6))

सोमवारी (६ फेब्रुवारी) दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर येथील पेट्रोल पंपासमोर थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं होतं. मात्र मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

Aditya Thackeray यांच्या सभेत जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

अशोक वालम यांनी काय केले आरोप?

शशिकांत वारीशे हे ‘महानगरी टाइम्स’ वृत्तपत्रासाठी काम करत होते. सोमवारी सकाळी ८ वा. वारीशेंनी एका व्हाट्सअप ग्रुपवर एक बातमी पोस्ट केली होती. ‘पंतप्रधान मोदींसह, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो, रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप’ अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीशे यांनी टाकलं होतं. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनर संदर्भात हि बातमी होती.

Congress वाढवण्यासाठी पाठवलं, तोडण्यासाठी नाही! बड्या नेत्यानं पटोलेंना सुनावलं

वारीशे यांनी बातमी पोस्ट केल्यानंतर अवघ्या ४ ते ५ तासांमध्ये अपघात झाला. ज्याच्याबाबत ती बातमी होती त्या पंढरीनाथ आंबेरेकर याच्याच गाडीने वारीशे यांना धडक दिली. हा पत्रकार रिफायनरी विरोध सातत्याने लोकांसमोर मांडत होता, त्यामुळे हा पूर्वनियोजित कट आहे, हा जाणूनबुजून केलेला खून आहे असा आरोप अशोक वालम यांनी केला आहे. तसेच यावर कडक कारवाईची मागणीही वालम यांनी केली आहे.

घटनेबाबत पोलीस काय म्हणाले?

दरम्यान, या अपघाताबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, या अपघाताबाबत पोलिसांनी प्राथमिक तपास केला, त्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरु शकेल आशा प्रकारे घटनेची नोंद घेतली. त्यानंतर भादंवी कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपीला राजापूर न्यायालयात हजर केलं असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाबाबत पोलीस सर्व बाबी तपासत आहेत, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती घेतली जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp