नागपुरात नवरा बायको मोबाईलच्या सहाय्याने चालवायचे सेक्स रॅकेट, पोलिसांनी रस्त्यातच रंगेहाथ पकडलं

योगेश पांडे

• 04:59 PM • 10 Feb 2026

Nagpur crime : पोलिसांनी रस्त्याच्यामध्येच छापा मारत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नवरा-बायकोला अटक केली. एवढंच नाही तर दोन तरुणींनाही वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपुरातील हे जोडपं त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने सेक्स रॅकेटचं काम करत असल्याची माहिती समोर आली.

sex racket

sex racket

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सेक्स रॅकेटचं प्रकरण आलं समोर

point

वाटेतच नवरा-बायकोला केली अटक

Nagpur crime : पोलिसांनी रस्त्याच्यामध्येच छापा मारत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नवरा-बायकोला अटक केली. एवढंच नाही तर दोन तरुणींनाही वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपुरातील हे जोडपं त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने सेक्स रॅकेटचं काम करत होतं, महिलांना वेश्याव्यवसायात ढकलून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरु असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ही घटना नागपूर शहरात घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा अपघातात दुर्दैवी अंत, कारचा झाला चेंदामेंदा

पोलिसांनी आरोपींना वाटेतच पकडलं

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समोर आली आहेत. तौफिक नियाज कुरेशी (वय 26) आणि झोया तौफिक कुरेशी (वय 36) अशी त्यांची नावे आहेत. नवरा-बायको दोन्ही महिलांना नागपुरातील दुर्गावती चौकातील पेट्रोल पंपाजवळील त्यांच्या ग्राहकांच्या घरी सोडण्यासाठी निघणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे, पोलिसांनी पाठलाग करत आरोपींना वाटेत थांबवलं.      

या प्रकरणात महिलांशी चौकशी केल्यानंतर, पीडित महिलांनी सांगितले त्यांना ग्राहकांकडे घेऊन जात होते. चौघांनाही पाचपावली पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते, तसेच महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. 

हे ही वाचा : रेवती सुळे यांचं लग्न ठरलं, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई कोण? 

पौफिया हा झोयाचा दुसरा पती आहे. झोयाने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी तौफिकशी विवाह केला. पोलिसांना माहिती मिळाली की, हे जोडपे महिलांना वेश्याव्यवसायात ढकलत आहे. त्यांना त्यांच्या ग्राहकांकडे पोहोचवण्याचे काम करते.