अजितदादा प्लास्टिक बाटलीवरून काचेच्या बाटलीचा वापर का करू लागले? रोहित पवारांनी घातपाताची मांडली थेअरी

मुंबई तक

10 Feb 2026 (अपडेटेड: 10 Feb 2026, 06:42 PM)

Rohit Pawar On Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. केवळ पवार कुटुंबच नाहीतर संपूर्ण राज्याला हा मोठा हादरा बसला आहे. त्यांच्या निधनामागे काहीतरी मोठा कट असल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते व्यक्त करत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी प्रेसच्या माध्यमातून अजितदादांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली.

Rohit Pawar

Rohit Pawar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबियांना मोठा धक्का

point

पाण्याच्या बाटलीवरून संशय

point

रोहित पवारांची घातपाताची मांडली थेअरी

Rohit Pawar On Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. केवळ पवार कुटुंबच नाहीतर संपूर्ण राज्याला हा मोठा हादरा बसला आहे. त्यांच्या निधनामागे काहीतरी मोठा कट असल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते व्यक्त करत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी प्रेसच्या माध्यमातून अजितदादांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली. एवढंच नाहीतर त्यांनी अजितदादांनी अलीकडे पाण्याची बाटली देखील का बदलली यावरून देखील संशय व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपुरात नवरा बायको मोबाईलच्या सहाय्याने चालवायचे सेक्स रॅकेट, पोलिसांनी रस्त्यातच रंगेहाथ पकडलं

पाण्याच्या बॉटलीवरून संशय

रोहित पवार यांनी अजितदादांच्या पाण्याच्या बॉटलीवरून संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, मी पूर्वीचे दादांचे व्हिडिओ पाहिले होते, त्यात दादा प्लास्टिकच्या बॉटलीसोबत काही गोष्टी करताना बघितलं असेल, पाणी पिताना बघितलं असेल. तेव्हा रोहित पवार  सुईसारखी वस्तू पाण्याच्या बॉटलीमध्ये खुपसतात, तेव्हा प्लास्टिकची बाटली पिवळसर रंगाची होताना दिसते. नंतर सांगतात की, याच कारणाने दादांनी अलीकडच्याकाळात प्लास्टिक बॉटली वापरणं बंद केलं होतं. 

हे ही वाचा : रेवती सुळे यांचं लग्न ठरलं, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई कोण? 

'काचेची बाटली दादा वापरू लागले...'

दरम्यान, रोहित पवार यांनी हातात दुसरी बाटली घेतली, ती बॉटल खालून थोडी रुंद आणि वरून निमुळत्या आकाराची काचेची बाटली होती, तिच बाटली दादा वापरू लागले होते. त्यांच्या मनात असं की कधीही काहीही होऊ शकतं असं त्यांच्या मनात असेल, असं रोहित पवार म्हणाले. दादांच्या मागे विश्वासू असणाऱ्याकडे देखील काचेचीच बाटली होती. मग दादा प्लास्टिक बाटलीवरून काचेच्या बाटलीवर का आले? असा प्रश्न उपस्थित होतो.