बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान यांचे शेजारी होणार आहेत. रणवीर सिंहने वांद्रे भागातील सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
ADVERTISEMENT
रणवीर सिंह आणि दीपिक पदुकोणच्या या नवीन घरातून अरबी समुद्राचं सुंदर दृश्य नजरेस पडतं. रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचं हे घर कसं असणार आहे, याबद्दलची माहितीही समोर आली आहे.
रणवीर सिंह-दीपिका पदुकोणने केली महागडी घर खरेदी
हे घर रणवीर सिंहने खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटचं सध्या काम सुरू आहे. रणवीर सिंहने जे अपार्टमेंट खरेदी केलं आहे, तिथून सुमद्राच मन प्रसन्न करणार दृश्य दिसतं. रिपोर्टनुसार रणवीर सिंहने हे घर तब्बल ११९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे.
रणवीर सिंहने खरेदी केलेलं घर देशातील काही महागड्या घर खरेदीपैकी एक असल्याचं सांगितलं जातंय. रणवीर सिंह-दीपिका पदुकोणच्या या नवा घराबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांचं हे नवीन घर अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत आणि सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या मध्यभागी आहे.
कसं असणार रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचं घर?
रणवीर सिंहचं अपार्टमेंट या टॉवरमधील १६व्या, १७व्या, १८व्या आणि १९व्या मजल्यावर असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. यात एकूण ११ हजार २६६ चौरसफुटचा कार्पेट एरिया आहे. या घराबरोबर रणवीर सिंहला १९ पार्किंग एरिया मिळाला आहे.
महागड्या प्रॉपर्टीचा मालक बनला रणवीर सिंह
रणवीर सिंहने ओह फाईव्ह मीडिया वर्क्स एलएलपीच्या माध्यमातून ही घर खरेदी केली आहे. या कंपनीत रणवीर सिंहचे वडीलच संचालक आहेत. रणवीर सिंहने घर खरेदीपोटी ७.१३ कोटींची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.
रणवीर सिंहच्या सध्या पडद्यावरील कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याची अलिकडेच जयेशभाई जोरदार हा सिनेमा आला होता. त्याचबरोबर रणवीर सिंहचा बिअर ग्रील्ससोबत मॅन व्हर्सेस वाईल्डचा एपिसोडही प्रदर्शित झाला आहे.
रणवीर सिंहचा रोहित शेट्टीसोबत सर्कस नावाचा सिनेमा येणार आहे. त्याचबरोबर करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटही लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं प्रमोशनसाठी रणवीर सिंह कॉफी विथ करण शो मध्येही गेला होता.
ADVERTISEMENT
