RBI कडून सोलापूरमधल्या लक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेचं लायसन्स केलं रद्द, ‘हे’ आहे कारण

भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये असलेल्या लक्ष्मी को ऑपरेटीव्ह बँकेचं लायसन्स रद्द केलं आहे. बँकेत निधीची कमतरता आहे तसंच बँकेचं उत्पन्न वाढण्याची चिन्हं नाही. त्यामुळेच आरबीआयने ही कारवाई केली आहे. एएनआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. Reserve Bank of India (RBI) cancels the licence of The Laxmi Co-operative Bank Ltd, Solapur, Maharashtra; depositors can claim up […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:02 PM • 22 Sep 2022

follow google news

भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये असलेल्या लक्ष्मी को ऑपरेटीव्ह बँकेचं लायसन्स रद्द केलं आहे. बँकेत निधीची कमतरता आहे तसंच बँकेचं उत्पन्न वाढण्याची चिन्हं नाही. त्यामुळेच आरबीआयने ही कारवाई केली आहे. एएनआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हे वाचलं का?

या सहकारी बँकेकडे पुरेसं भांडवल उपलब्ध नाही असं आरबीआयने म्हटलं आहे. लिक्विडेशनवर प्रत्येक ठेवीदाराला पाच लाख रूपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत ही बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत करू शकणार नाही. बँकेला काम करू दिलं तर ग्राहकांच्या हिताचं नुकसान होईल असंही आरबीआयने म्हटलं आहे.

आरबीआयचे (RBI) हे आदेश आजपासून लागू असणार आहेत. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, तात्काळ प्रभावाने लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात इतर बाबींव्यतिरिक्त ठेवी स्वीकारणे आणि ठेवीची परतफेड करणे आदींचा समावेश आहे.

सोलापुरातील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नेमणूक केली होती. त्यानंतर पाच लाख रुपयांच्या आतील रक्कम असलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे दिले जाणार होते. त्यासाठी जवळपास सव्वा महिन्यांची मोहीम राबवण्यात आली होती.

    follow whatsapp