Patra chawl land scam : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी; PMLA न्यायालयात काय घडलं?

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमएल न्यायालयाकडून जामीन मिळणार की, त्यांना ईडी कोठडीत जावं लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ईडीकडून संजय राऊत यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली, पण पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनसोबत करार केल्यानंतर जमीन घोटाळा झाल्याचं समोर आलं […]

mumbaitak

mumbaitak

विद्या

• 10:25 AM • 01 Aug 2022

follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमएल न्यायालयाकडून जामीन मिळणार की, त्यांना ईडी कोठडीत जावं लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ईडीकडून संजय राऊत यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली, पण पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.

हे वाचलं का?

पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनसोबत करार केल्यानंतर जमीन घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाच ईडीने उडी घेतली. या प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांची चौकशी ईडीकडून सुरू झाली होती.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर PMLA कोर्टात हजर केलं गेलं

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीकडून आज दुपारी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांची चौकशी करण्यासाठी ८ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली.

Uddhav Thackeray : संजय राऊत यांचा मला अभिमान आहे, ते स्पष्ट बोलतात म्हणूनच त्यांना अटक

ईडीच्या मागणीला संजय राऊत यांच्या वकिलांनी विरोध केला. संजय राऊत यांच्यावर झालेली अटकेची कारवाई ही राजकीय कटाचा भाग आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर हे झालं आहे, असं सांगत वकिलांनी ८ दिवसांच्या कोठडीस विरोध केला.

न्यायालयाने संजय राऊत यांना तीन दिवसांची (४ ऑगस्ट) ईडी कोठडी सुनावली आहे. सुनावणीवेळी संजय राऊत यांच्या आरोग्याबद्दलचे मुद्दे वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले. त्यांच्या प्रकृतीबद्दलचे कागदपत्रेही वकिलांनी न्यायालयात सादर केले.

संजय राऊत यांच्या आजारपणाचा मुद्दा लक्षात घेऊन न्यायालयाने ईडीला चौकशी करण्यासंदर्भातही काही सूचना केल्या. रात्री १०.३० नंतर चौकशी करू नये असं न्यायालयाने ईडीला सांगितलं. त्याचबरोबर त्यांच्या जबाबदारीवर त्यांना घरचं जेवण देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पत्रकार, शिवसेना खासदार, मविआचे शिल्पकार असलेल्या संजय राऊतांचा राजकीय प्रवास आहे तरी कसा?

संजय राऊत यांना कोठडी देण्यापूर्वी न्यायालयात काय घडलं? संपूर्ण सुनावणी ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

संजय राऊतांची यापूर्वी झाली होती ईडी चौकशी

१ जुलै रोजी संजय राऊत ईडी कार्यालयात गेले होते. ईडीकडून संजय राऊत यांची १० तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर २० जुलै आणि २७ जुलै रोजी राऊतांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. पण, संसद अधिवेशनामुळे राऊत हजर राहु शकत नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं.

    follow whatsapp