पत्रा चाळ जमीन घोटाळा : संजय राऊत यांना अटक! ईडीची कारवाई, शिवसेनेला मोठा धक्का

shiv sena MP sanjay Raut arrested in Patra chawl land scam : दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीची मोठी कारवाई
shiv sena MP sanjay Raut arrested in Patra chawl land scam
shiv sena MP sanjay Raut arrested in Patra chawl land scam

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, नेते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झालीये. काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केलीये. दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही अनुपस्थित राहिल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना त्यांच्या भांडुप येथील घरातून ताब्यात घेतलं होतं.

मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यावरून ईडीने या प्रकरणाचा मनी लाँडरिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांचं नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याची चौकशी सुरू केली होती.

संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी काय घडलं?

२० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

दुपारी चार वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरीच होते. संसदेचं अधिवेशन सुरू असताना ईडी कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं संजय राऊतांकडून ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. संजय राऊतांच्या वकिलांनीही याचं कारणावरून ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला. नऊ ते दहा तास चाललेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भांडुप येथील निवासस्थानावरून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

shiv sena MP sanjay Raut arrested in Patra chawl land scam
संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?

फ्लॅट, जमीन जप्त

पत्रा चाळ प्रकरणात ईडीकडून यापूर्वी संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आलेली आहे. ईडीकडून संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीनही ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे.

विरोधकांकडून मोदी सरकार-भाजपवर टीका

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून विरोधकांनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे. केंद्रीय यंत्रणा या मोदी सरकारच्या राजकीय टूल झाल्या असल्याचा आरोप, काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही या कारवाईवर टीका केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाने मात्र आनंदी सूर लावला आहे.

ईडी कार्यालयात जाण्याअगोदर काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊतांनी ईडी कार्यालयात जाण्याअगोदर शिंदे गटावर प्रहार केला होते. पेढे वाटा पेढे, असं सांगत संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना सुनावलं होतं.

पुढे संजय राऊत म्हणाले, 'ज्याप्रकारे खोटी कागदपत्रे, खोट्या साक्ष, हे सगळं महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी केलं जात आहे. शिवसेनेला कमजोर करण्यासाठी केलं जात आहे, पण शिवसेना कुमकुवत होणार नाही. महाराष्ट्र कमजोर होणार नाही."

"दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही. संजय राऊत शिवसेना सोडणार नाही", असं संजय राऊत म्हणाले. शिरसाटांच्या विधानावर राऊत म्हणाले, "पेढे वाटा पेढे. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे. अरे बेशरम लोक आहात तुम्ही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला".

संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर भाऊ सुनील राऊत काय म्हणाले होते?

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर सुनील राऊत म्हणाले, ''महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक असल्याने संजय राऊतांवर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात त्यांच्याकडे काहीही पुरावे नाहीत. या प्रकरणाचे कारण देऊन दुसऱ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. सुनील राऊत हे स्वत: शिवसेनेचे आमदार आहेत. सकाळपासून ते संजय राऊतांसोबत होते.

पुढे सुनील राऊत म्हणाले "बाळासाहेब झुकले नाहीत. संजय राऊत झुकणार नाही. ते उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत. जेव्हा संजय राऊतांना नेलं, तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. माझी आई कट्टर शिवसैनिक आहे. ED चं जे समन्स आलं होतं ते पत्राचाळचं होतं. जे डॉक्युमेंट्स होते ते इन्कम टॅक्सचे आहेत. आमच्या पण डोळ्यात अश्रू आहेत, पण संजय राऊत झुकणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही कुणीही शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंना सोडणार नाही".

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in