Sara Ali Khan : मंदिरात जाण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना साराचं सणसणीत उत्तर, म्हणाली…

मुंबई तक

• 01:46 AM • 22 Mar 2023

सारा अली खानचे सुरुवातीचे चित्रपट हिट ठरले, पण त्यानंतरचे चित्रपट एकतर चालले नाहीत किंवा OTT वर प्रदर्शित झाले. लवकरच प्रदर्शित होणारा गॅसलाइट चित्रपट, OTT वर प्रदर्शित होणारा साराचा तिसरा चित्रपट आहे. आपण साराला अनेकदा देवदर्शनाला गेलेलं पाहिलं असेल. कधी केदारनाथ तर कधी महाकाल, पण यामुळेही ती ट्रोल होते. यावर एका मुलाखतीमध्ये ती बोलली आहे. सारा […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

सारा अली खानचे सुरुवातीचे चित्रपट हिट ठरले, पण त्यानंतरचे चित्रपट एकतर चालले नाहीत किंवा OTT वर प्रदर्शित झाले.

लवकरच प्रदर्शित होणारा गॅसलाइट चित्रपट, OTT वर प्रदर्शित होणारा साराचा तिसरा चित्रपट आहे.

आपण साराला अनेकदा देवदर्शनाला गेलेलं पाहिलं असेल. कधी केदारनाथ तर कधी महाकाल, पण यामुळेही ती ट्रोल होते.

यावर एका मुलाखतीमध्ये ती बोलली आहे. सारा म्हणाली, ‘माझ्या कामाबद्दल प्रेक्षकांना काही अडचण असेल, तर माझ्यासाठी ही समस्या असू शकते.’

‘कारण मी फक्त माझ्या चाहत्यांसाठी अभिनय करते. लोकांचे काय ऐकावे, काय ऐकू नये हे मला चांगलंच समजतं.’

‘पण जर कोणाला माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल किंवा माझ्या राहणीमानाबद्दल अडचण असेल, तर मला त्याची पर्वा नाही’, असं सारा पुढे म्हणाली.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा