नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आहे. आता लॉरेन्स बिश्नोई टोळीबाबत मोठा खुलासा झाला आहे. पंजाब म्युझिक इंडस्ट्रीनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग बॉलिवूडमध्ये आपली दहशत पसरवण्याच्या तयारीत होती. लॉरेन्स गँगचे लक्ष्य होते ते मोठे स्टार, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते असा दावा खुद्द गँगस्टर सौरभ महाकालने केला आहे.
ADVERTISEMENT
सौरभ महाकालने केला धक्कादायक खुलासा
लॉरेन्स टोळीचा कुख्यात गँगस्टर सौरभ महाकाल याचा कबुलीजबाब ‘आज तक’च्या हाती लागला आहे, ज्यात तो स्वतः कबूल करतोय की, केवळ सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला गेला नव्हता, तर मुसेवालाच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांना धमकीचे पत्र पाठवून दहशत निर्माण करण्याचा प्लॅन होता.
गँगस्टर सौरभ महाकालच्या दाव्यानंतर मुंबई पोलिसांना अजून अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. लॉरेन्स टोळीतील लोक बॉलिवूडमध्ये आपली दहशत पसरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. महाकालने पोलिसांसमोर अनेक खुलासे केले आहेत. महाकाळने दिलेला कबुलीजबाब कितपत खरा आहे याची चौकशी पोलीस करत आहेत.
‘करण जोहर’कडून पाच कोटी खंडणी मागण्याचे प्लॅनिंग
सलमान खान धमकावण्याचे कसे प्लॅनिंग सुरु होते याबाबतही महाकालने सांगितले आहे. त्याने दिलेल्या जबाबानुसार प्रशांत सिंग राजपूत, संजय शर्मा, विक्रम ब्रार, मोनू जाट आणि अरुण जाट हे करण जोहरकडून 5 कोटींची खंडणी मागणार होते, हे सर्व लॉरेन्स बिश्नोई टोळीचे गुंड आहेत.
सलमान खानला धमकीचे पत्र पाठवले.
एवढेच नाही तर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलीम खान आणि सलमान खान यांना धमकीची पत्रे पाठवून बॉलिवूडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर असे बरेच काम होणार आहे, असे विक्रम ब्रारने ‘महाकाल’ला सांगितले होते.
गँगस्टर महाकालच्या कबुलीनुसार, विक्रम ब्रारला या मोठ्या कामाबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की राजस्थानमधील सूरज आमसा भद्रा अर्जुन आणि ओमसा भद्रा अर्जुन हे सलमान खानच्या घरी धमकीची पत्रे पाठवणार आहेत, त्यासाठी आमसा आणि सूरज पालघरमध्ये राहत आहेत.
इतकंच नाही तर सिद्धू मुसेवालाला मारण्यासाठी विक्रम ब्रारने वेगळी योजना आखली होती. त्यासाठी महाकालला लाखो रुपये देण्याचे आमिषही देण्यात आले होते. विक्रम ब्रार हा लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा मित्र असून तो मूळचा राजस्थानमधील हनुमानगडचा आहे. तो 28 जून 2018 रोजी खोट्या पासपोर्टसह यूएईला पळून गेला होता.
विक्रम ब्रार होता मास्टरमाईंड
ज्या बनावट पासपोर्टद्वारे विक्रम ब्रार पळून गेला, त्यावर विक्रमजीत सिंग असे नाव आहे आणि फोटो मात्र विक्रम ब्रारचा लावलेला आहे. गँगस्टर महाकालने महाराष्ट्र पोलिसांना सांगितले की तो विक्रमशी इंस्टाग्राम आणि सिग्नल अॅपवर बोलत असे. आणि सलमान खानला धमकीची पत्रे पाठवणारा मास्टरमाईंड विक्रमच आहे.
महाराष्ट्र पोलीसांचा तपास जारी
सौरभ महाकालने नक्कीच हे धक्कादायक खुलासे केले आहेत, परंतु याची सत्यता सुरक्षा यंत्रणांकडून पडताळली जात आहे. या दाव्यांमध्ये थोडीतरी सत्यता आढळली तर लॉरेन्स टोळीचे पुढील ध्येय काय होते हे स्पष्ट होईल. लॉरेन्स बिश्नोई बॉलीवूडमध्ये खंडणीते रॅकेट चालवण्याच्या प्रयत्नात होता का? याचाही तपास महाराष्ट्र पोलीस करत आहे.
ADVERTISEMENT
