बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सशी कनेक्टेड असतात. बॉलिवूडचा किंग खानही सोशल मीडियावर चांगलाच अॅक्विव्ह असतो. नुकतंच शाहरूखने ट्विटरवर #AskSRK असं सेशन घेतलं होतं. यावेळी युजरने विचारलेल्या एका प्रश्नावर शाहरूख खान चांगलाच भडकला. शिवाय त्या युजरला सडेतोड उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
#AskSRK या सेशन एकाने शाहरूखला मुलींना पटवण्याचा टीप्स मागितल्या. त्या युझरने विचारलं, ‘मुलींना पटवण्यासाठी काही टीप्स द्या सर’. हा प्रश्न पाहताच शाहरुखने त्याला चांगलंच सुनावलं. याला उत्तर देताना शाहरूख म्हणाला, “सर्वात आधी मुलींसाठी ‘पटवणं’ हा शब्द वापरणं बंद करा. मुलींसाठी जास्त सन्मान आणि आदर दाखवला पाहिजे.”
शाहरूखला या सेशनमध्ये अनेक चाहत्यांनी प्रश्न विचारले. शाहरूखने देखील अनेकांची उत्तर दिली. यावेळी एका युजरने शाहरुखला विचारलं “तुझ्या आगामी सिनेमाची घोषणा कधी होणार.” यावर शाहरूखने मिश्किलपणे उत्तर दिलं. शाहरूख म्हणाला, “घोषणा तर एअरपोर्ट्स आणि रेल्वे स्टेशनवर होतात. सिनेमांची तर हवा होते.”
शाहरूख खान नेहमी त्याच्या फॅन्सशी सोशल मिडीयावरून कनेक्ट राहत असतो. आज शाहरूखने #AskSRK या सेशनमधून त्याच्या अनेक फॅन्सशी संवाद साधला. या सेशनपूर्वी त्याने 15 मिनिटं तो फॅन्सशी बोलणार व त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
