Crime News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मधून नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. प्रकरणातील पीडित महिलेने तिच्या दोन्ही दीरांवर गंभीर आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. पती घरी नसताना दोन्ही दीर तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं संबंधित महिलेनं सांगितलं. तसेच, पीडितेने या सगळ्याला विरोध केला असता तिचे दीर तिच्या 10 महिन्यांच्या मुलीला मारून टाकणार असल्याची धमकी द्यायचे. तसेच, महिलेने हे सगळं केल्यानंतर तिचा नवरा आजारपणातून बाहेर येईल, असं आरोपी आपल्या वहिनीला आमिष दाखवायचे. खरंतर, संबंधित महिलेचा पती नेहमी आजारी असल्याकारणाने तो उपचारासाठी 20-20 दिवस रतलाममधील टेकरी शरीफ जवारा येथे जात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ही घटना 10 जानेवारी ते 25 मे 2025 दरम्यान ग्वाल्हेरमधील डबराच्या जांगीपुरा येथे घडली. पीडितेनं तिच्या पतीला घडलेला प्रकार सांगितला पण तेव्हा पतीनेच पीडितेला मारहाण केली आणि आपल्या भावाविरुद्ध मनात नको ते भरवत असल्याचा आरोपी पतीने आपल्या पत्नीवर केला. यामुळे पीडिता वैतागून तिच्या माहेरी निघून गेली. तिथे कौटुंबिक चर्चा करण्यात आली आणि त्यावेळी पीडितेच्या सासरच्या लोकांपैकी कोणीच उपस्थित नव्हतं. त्यानंतर, रविवारी संबंधित महिला तिच्या कुटुंबियांसोबत महिला पोलीस ठाण्यात गेली आणि तिने आपल्या दोन्ही दीरांविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यावेळी, पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचं पीडितेला सांगितलं.
हे ही वाचा: मोठी बातमी: अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरचा थेट Encounter, पोलिसांनी आरोपींना धाडलं यमसदनी
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डबरा शहरातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय पीडितेने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने तिचं लग्न 5 मे 2023 रोजी डबरा येथे राहणाऱ्या एका तरुणाशी झाल्याचं सांगितलं. लग्नाच्या काही दिवसांनंतर, तिच्या पतीची प्रकृती खालावल्यामुळे, तो उपचारासाठी वारंवार जावरा (रतलाम) येथे जायचा. पती बाहेर असताना 10 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजता, तिचा दीर तिच्या शिरला आणि पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यावेळी महिलेने विरोध केला असता आरोपीने तिच्या 10 महिन्यांच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली.
पीडितेसोबत अनेकदा घृणास्पद कृत्य
त्यावेळी आरोपी दीर खोलीतून निघून जाताच, तिचा मोठा दीर खोलीत शिरला आणि त्यानेही पीडितेवर बलात्कार केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, खोलीच्या दारावर कूलर बसवलेला होता, त्यामुळे दरवाजा बंद नव्हता. याचा फायदा घेत दोन्ही आरोपी खोलीत शिरले. जेव्हा महिलेने तिच्या दोन्ही दीरांच्या घृणास्पद कृत्याचा विरोध केला. पीडितेने दीरासोबत असं कृत्य केल्यास तिच्या पतीची तब्येत सुधारेल, असं देखील तिला सांगण्यात आलं. त्यानंतर, दोन्ही दीरांनी आपल्या वहिनीसोबत बऱ्याचदा घृणास्पद कृत्य केलं.
हे ही वाचा: 55 वर्षांच्या महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध! रागाच्या भरात पत्नी नको ते करून बसली अन्... नेमकं काय घडलं?
फेब्रुवारी 2025 मध्ये महिलेचा पती जावराहून घरी परतला तेव्हा तिने त्याला तिच्यासोबत घडलेल्या सर्व घटनेबद्दल सांगितलं. परंतु, तिच्या पतीने पीडितेलाच खोटं ठरवलं आणि तिला मारहाण केली. 23 फेब्रुवारी 2025 नंतर, ते त्यांच्या जांगीपूर येथील त्यांच्या घरातून बाजारातील घरात राहायला गेले. तिथेही, पीडितेचा नवरा घरी नसल्यावर तिचा दीर येऊन तिच्यावर बलात्कार करायचा. यानंतर, पीडितेने तिच्या कुटुंबासोबत ग्वाल्हेर महिला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
