Shivrajyabhishek Din 2021 : साताऱ्यात जलमंदीर पॅलेसमध्ये पार पडला राज्याभिषेक सोहळा

संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला जात आहे. रायगड किल्ल्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते ३४८ वा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तर साताऱ्यात छत्रपती शिवाजी महारांजे वारस खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्येही राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. Shivrajyabhishek Din 2021 : शिवराज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न जलमंदीर पॅलेसमध्ये उदयनराजे भोसलेंच्या हस्ते शिवाजी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:39 AM • 06 Jun 2021

follow google news

संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला जात आहे. रायगड किल्ल्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते ३४८ वा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तर साताऱ्यात छत्रपती शिवाजी महारांजे वारस खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्येही राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हे वाचलं का?

Shivrajyabhishek Din 2021 : शिवराज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न

जलमंदीर पॅलेसमध्ये उदयनराजे भोसलेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधीवत पूजन करुन त्यांना वंदन करण्यात आलं. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीतील लोकांना एकत्र आणून जुलमी राजवटीला आव्हान दिलं. आजचा दिवस हा भारतासाठी पहिला स्वातंत्र्यदीन असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलंय.

भारतात असे अनेक राजे दिसतील की ज्यांनी स्वतःला राजे म्हणून मिरवून घेतलं. पण शिवाजी राजेंनी कधीही स्वतःला राजे म्हणून मिरवलं नाही. पूर्वीच्या काळात असलेली लोकशाही आता राहिलेली नाही. पुर्वी गुण्या-गोविंदाने राहणारी माणसं आता वेगळी झाली आहेत, त्यांच्यात दरी निर्माण करण्यात आली याचा विचार सर्वांनी करायला हवा असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

Shivrajyabhishek Din 2021 : रायगडावर आई शिरकाईचा गोंधळ

    follow whatsapp