सोलापूर: महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन कॉलवरून कारवाई थांबविण्याचे आदेश देत असल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच अडचणीत आले आहेत. ज्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीकाही केली. त्यामुळे आता अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणात सोशल मीडियावरून स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. या स्पष्टीकरणात अजित पवार म्हणतात की, ते कायदा आणि सुव्यवस्थेत हस्तक्षेप करत नव्हते, तर तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा
ADVERTISEMENT
'मे तेरे उपर अॅक्शन लूंगा... इतना डेरिंग हुआ है क्या?', आधी महिला IPS असं म्हणाले आता अजित पवारांचं स्पष्टीकरण
'सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.'
हे ही वाचा>> महिला आयपीएस अंजली कृष्णा अजित पवारांना थेट नडल्या, वाळू तस्करी करणाऱ्यांचे उपटले कान, फोन कॉलवर काय घडलं?
'आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे.'
'मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.' असं स्पष्टीकरण आता अजित पवार यांनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
खरं तर, 4 सप्टेंबर रोजी रस्त्याच्या बांधकामात बेकायदेशीर उत्खननाची तक्रार मिळाल्यानंतर सोलापूरच्या डीएसपी अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयपीएस अधिकाऱ्याबद्दल तक्रार करण्यासाठी फोन केला आणि फोन डीएसपी अंजना कृष्णा यांना दिला.
हे ही वाचा>> अजितदादांनी केले हात वर, मग कुणाला हवेत सूरज चव्हाण? NCP मध्ये अजित पवारांना कोण ठरतंय सरस?
या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अंजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवर बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हणालेले की, "तुम्ही इतके धाडसी झाला आहात का?"
अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांच्यातील 'त्या' व्हिडिओमधील नेमकं संभाषण काय?
यावेळी अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांच्यात हिंदीतून संभाषण झालं होतं. वाचा ते जसंच्या तसं..
IPS अंजना कृष्णा: तहसील ऑफिस से ही हमको रिक्वेस्ट की गयी..
अजित पवार: तहसीलदारनेही रिक्वेस्ट की ना?
IPS अंजना कृष्णा: हमको उनको मदत करने का ही काम है सर..
अजित पवार: मैं डेप्युटी चीफ मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ की ओ रुकवावो.. और आप जाओ और तहसीलदार को बताओ, खुद अजित पवारजी का फोन आया था.. डेप्युटी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए.. क्यों की अभी बंबई में जरा अभी... बंबई का माहौल अभी एकदम खराब हुआ है. उसको अपने को प्राधान्य देना है. मेरा नाम बताओ उनको. बाकी मुझ पर छोड दो.
IPS अंजना कृष्णा: सर आप एक काम किजीए, मेरे फोन मैं डायरेक्ट कॉल किजीए..
अजित पवार: एक मिनिट.. एक मिनिट.. मैं तेरे उपर अॅक्शन लूँगा.. अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ.. आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो?
IPS अंजना कृष्णा: सर, समझ रही हूँ जो आप बोल रहे हो समझ रही हूँ, पर मुझे एक...
अजित पवार: सुनो, सुनो... मुझे देखना है ना? मेरा नंबर देता हूँ.. व्हॉट्सअॅप कॉल करो.. मैं यहाँ से बोल देता हूँ..
IPS अंजना कृष्णा: ठीक है सर..
अजित पवार: मेरा चेहरा तो आपको समझ मैं आयेगा ना?
IPS अंजना कृष्णा: ठीक है सर..
अजित पवार: इतना आप को डेरिंग हुआ है क्या?
IPS अंजना कृष्णा: सर जो कारवाई किया है मुझे कैसे पता है सर.. मुझे पता नहीं है ना सर.. मैं सिर्फ यही बोल रही हूँ..
अजित पवार: देखो मैं डेप्युटी चीफ मिनिस्टर बोल रहा हूँ
IPS अंजना कृष्णा: मैं समझ रही हूँ.. आप जो बोल रहे हो..
अजित पवार: आपका नंबर दे दो मुझे.. मैं आपको डायरेक्ट कॉल करता हूँ.. नंबर दे दो ना..
IPS अंजना कृष्णा: सर 944....
कोण आहेत IPS अंजना कृष्णा?
सोलापूर जिल्ह्यात तैनात असलेल्या IPS अंजना कृष्णा सध्या करमाळ्याच्या DCP आहेत. त्या 2023 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा-2022 मध्ये AIR-355 रँक मिळवला होता.
अंजली कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा वीएस असं आहे. अंजना सध्या सोलापूर जिल्ह्यात करमाळाच्या पोलीस अपअधीक्षक (डीएसपी) पदावर कार्यरत आहेत. अंजना कृष्णा या डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्या अत्यंत नैतिकतेने आपली जबाबदारी पार पाडतात. अंजली कृष्णा यांचा जन्म 12 डिसेंबर 1997 रोजी केरळच्या तिरुवनंतपुरम येथील मलयंकीजू गावात झाला होता. त्यांचे वडील बीजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. तर त्यांची आई सीना या कोर्टात टायपिस्ट म्हणून नोकरीवर आहेत. अंजली या एका सर्वसामान्य कुंटुंबातून आल्या आहेत.
अंजली यांनी पूजप्पुरा येथील सेंट मॅरीज सेंट्रल स्कूल येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर तिरुवनंतपुरमच्या नीरमंकरा येथील HNMSPB NSS कॉलेज फॉर वुमेन येथून शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी नीरामंकराच्या NSS कॉलेजमध्येच BSC गणित म्हणून पदवी शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी केली होती आणि त्यात त्यांना यश आलं.
ADVERTISEMENT
