रोड रोलरच्या चाकाखाली सापडून सहा वर्षांचा चिमुकला जागीच ठार, ओतूरमधली धक्कादायक घटना

मुंबई तक

• 07:35 AM • 29 Dec 2021

स्मिता शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर जुन्नर तालुक्यात रस्त्याचे खडीकरण करून मजबुतीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी रोड रोलरच्या वजनदार चाकाखाली एक अवघा सहा वर्षांचा मुलगा आल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर चालक फरार झाला आहे. सदरची घटना ओतूर ते ठिकेकरवाडीच्या जुन्या रस्त्यावर घडली असून आदित्य राजेंद्र लोणकर (वय ६) रा.जुना ठिकेकरवाडी रोड,ओतूर असे मृत झालेल्या […]

Mumbai Tak
Google CTA

स्मिता शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर

हे वाचलं का?

जुन्नर तालुक्यात रस्त्याचे खडीकरण करून मजबुतीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी रोड रोलरच्या वजनदार चाकाखाली एक अवघा सहा वर्षांचा मुलगा आल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर चालक फरार झाला आहे.

सदरची घटना ओतूर ते ठिकेकरवाडीच्या जुन्या रस्त्यावर घडली असून आदित्य राजेंद्र लोणकर (वय ६) रा.जुना ठिकेकरवाडी रोड,ओतूर असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आदित्य हा आज मंगळवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या रहात्या घरापासून जवळच्याच रस्त्यावर छोटी दुचाकी सायकल खेळत रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आला.

त्यावेळी हा गंभीर अपघात घडला. अपघात घडल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर चालक फरार झाला.रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर सध्या वर्दळ फारच कमीच होती त्यामुळे हा प्रकार सुरवातीला कोणाच्याही लक्षात आला नाही.

अपघाताची खबर मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान आदित्यच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने त्याच्या परिवाराचा सुरू असलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता,त्यामुळे उपस्थित सर्वांचीच मने हेलावून गेली,अशा लहान मुलांच्या बाबत घडणारे गंभिर अपघात टाळण्यासाठी पालकांनी अधिकची दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे.