अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी चोरी, १.४ कोटीची रक्कम आणि दागिने लंपास

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी चोरी झाली आहे. यामध्ये १.४ कोटींची रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोर लंपास झाले आहेत. दिल्लीतील अमृता शेरगिल रोडवर आनंद अहुजा यांचे वडील हरीश अहुजा आणि प्रिया अहुजा राहतात. त्यांच्या घरात चोरी झाली आहे. याच घरात सोनम कपूरची आजे सासू सरला आहुजा यादेखील राहतात. सरला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:32 AM • 09 Apr 2022

follow google news

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी चोरी झाली आहे. यामध्ये १.४ कोटींची रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोर लंपास झाले आहेत. दिल्लीतील अमृता शेरगिल रोडवर आनंद अहुजा यांचे वडील हरीश अहुजा आणि प्रिया अहुजा राहतात. त्यांच्या घरात चोरी झाली आहे. याच घरात सोनम कपूरची आजे सासू सरला आहुजा यादेखील राहतात.

हे वाचलं का?

सरला आहुजा यांनी घरातील मॅनेजर रितेश गौरासोबत तुघलक रोड पोलीस स्टेशनला गेल्या. घरातील कपाटातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिली. पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली तेव्हा ही बातमी समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोनमच्या आजीच्या घरी जवळपास ३५ नोकर काम करतात आणि आता पोलीस या सर्वांची चौकशी करू शकतात.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना फेब्रुवारीमध्ये सोनम आणि आनंदच्या दिल्लीतील घरात घडली होती. सोनमची ८६ वर्षीय आजी सरला, अभिनेत्रीचे सासरे हरीश अहुजा आणि प्रिया अहुजा दिल्लीत राहतात. सरला यांचे व्यवस्थापक रितेश गौरा यांनी २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या घरातील कपाटातून १.४ कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सोनम कपूर होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

या अहवालात असेही म्हटले आहे की पोलिसांनी या प्रकरणात त्यांच्या घरातील २५ नोकर, नऊ केअरटेकर, ड्रायव्हर आणि काम करणाऱ्या इतर लोकांची चौकशी केली. ११ फेब्रुवारीला सरला यांनी तब्बल दोन वर्षांनंतर त्यांचं कपाट तपासल्याचं सांगितलं. त्यानंतर आपले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर या प्रकरणी त्यांनी २३ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली.

    follow whatsapp