पतीसोबतचे संबंध सुधारावेत यासाठी केले तंत्र-मंत्र...अन् नंतर तांत्रिकासोबतच पळून गेली पत्नी

Crime News : नवऱ्यासोबतचे संबंध सुधारावेत यासाठी घरी बोलावलेल्या तांत्रिकावरच एका महिलेचा जीव जडला आणि त्याच्यासोबतच ती पळून गेली. घरातील दागिने आणि मोठी रोकड घेऊन महिला तांत्रिकासोबत पळून गेली. महिला घरातून पळून गेल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत महिलेला ताब्यात घेतले. यानंतर त्या महिलेने केलेल्या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे

Crime News

Crime News

मुंबई तक

• 11:17 AM • 11 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीसोबतचे संबंध सुधारावेत यासाठी केले तंत्र-मंत्र

point

अन् नंतर तांत्रिकासोबतच पळून गेली महिला

Crime News : प्रेमसंबंधातून पळून जाण्याच्या अनेक घटना घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्यासोबतचे संबंध सुधारावेत यासाठी घरी बोलावलेल्या तांत्रिकावरच एका महिलेचा जीव जडला आणि त्याच्यासोबतच ती पळून गेली. घरातील दागिने आणि मोठी रोकड घेऊन महिला तांत्रिकासोबत पळून गेली. महिला घरातून पळून गेल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत महिलेला ताब्यात घेतले. यानंतर त्या महिलेने केलेल्या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील इंदोरमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून... प्रेमत्रिकोणातून भयंकर हत्याकांड! शिवाजीनगरमध्ये खळबळ
 

महिला गायब झाल्याने खळबळ

मध्य प्रदेशातील इंदोरमधील बाणगंगा परिसरात राहणारी एक महिला घरातील दागिने आणि मोठी रोकड घेऊन अचानक गायब झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. महिलेच्या कुटुंबीयांनी तातडीने बाणगंगा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरु केला असता, ही महिला एका तांत्रिकासोबत पळून गेल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी तिला भोपाळमधून ताब्यात घेतले आहे.

भोपाळमध्ये सापडली महिला

महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तपास पथक तैनात केले. सुरुवातीला पती आणि नातेवाईकांच्या जबाबांमध्ये तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला असता, महिलेचे शेवटचे लोकेशन भोपाळमध्ये मिळाले. इंदूर पोलिसांनी तातडीने भोपाळ गाठून महिलेला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि तिच्याकडून काही सोन्या-चांदीचे दागिनेही हस्तगत केले.

हे ही वाचा : पुणे : बुधवार पेठेत मध्यरात्रीच पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन; अनेकांची उडाली तारांबळ, नेमकं काय घडलं?

...म्हणून तांत्रिकासोबत गेली पळून

पोलीस चौकशीदरम्यान महिलेने अत्यंत धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, ती आपल्या पतीच्या जाचाला आणि सततच्या घरगुती वादाला कंटाळली होती. याच काळात तिची ओळख राकेश जाटव नावाच्या तरुणाशी झाली. राकेश हा पूजा-पाठ आणि तांत्रिक विधी करण्याचे काम करायचा. घरगुती समस्या सोडवण्याच्या बहाण्याने त्यांच्यात संवाद वाढला आणि या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मानसिक तणावात असलेल्या महिलेने अखेर राकेशसोबत घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राकेश जाटव हा तांत्रिक विधींच्या नावाखाली लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे. महिलेला त्याने काही भुरळ घातली होती का किंवा तिला फूस लावून नेले होते का, या बाजूनेही पोलीस तपास करत आहेत. 
 

    follow whatsapp