दुर्दैवी ! खड्ड्यांत गाडी आदळल्यामुळे गोळी छातीत घुसली, सशस्त्र सीमा बलाच्या जवानाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरात येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमधील जवानाच्या छातीत गोळी लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या फोर्समधील डॉक्टरला नांदेड रेल्वे स्थानकातून आणण्यासाठी जात असताना खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्यामुळे रायफलमधून निघालेली गोळी जवान भानूप्रसाद पप्पाला यांच्या छातीत घुसली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:10 AM • 22 Nov 2021

follow google news

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरात येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमधील जवानाच्या छातीत गोळी लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या फोर्समधील डॉक्टरला नांदेड रेल्वे स्थानकातून आणण्यासाठी जात असताना खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्यामुळे रायफलमधून निघालेली गोळी जवान भानूप्रसाद पप्पाला यांच्या छातीत घुसली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेले जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद ( वय 35 वर्षे राहणार आंध्र प्रदेश ) हे कर्तव्यावर होते. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ते डिपार्टमेंटच्या गाडीतून आपल्या फोर्समधील डॉक्टरला घेण्यासाठी नांदेडकडे निघाले होते. चालक आणि जवान जात असताना डोंगरकडा ते नांदेड रस्त्यावर डोंगरकडा पासून तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

याठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे वाटेत मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात गाडी आदळल्याने भानुप्रसाद यांच्या रायफलमधून गोळी सुटून थेट छातीत बसली. यानंतर भानुप्रसाद यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी भानूप्रसाद यांना मृत घोषित केलं. सशस्त्र सीमा बलाच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी अद्याप प्रतिक्रीया दिलेली नाहीये. बाळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.

    follow whatsapp