Sheena Bora Murder Case : मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई तक

• 07:00 AM • 18 May 2022

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जी जेलमधून बाहेर येणार आहे. जस्टीस एल. नागेश्वर राव, जस्टीस बी.आर.गवई आणि जस्टीस ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत आज इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी इतक्यात संपणार नसून इंद्राणी साडेसहा वर्ष तुरुंगात असल्यामुळे […]

Mumbaitak
follow google news

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जी जेलमधून बाहेर येणार आहे. जस्टीस एल. नागेश्वर राव, जस्टीस बी.आर.गवई आणि जस्टीस ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत आज इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

या खटल्याची सुनावणी इतक्यात संपणार नसून इंद्राणी साडेसहा वर्ष तुरुंगात असल्यामुळे तिचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

मुंबई हायकोर्टाने २०२१ मध्ये इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता, ज्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा खटला परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर सुरु आहे. सरकारी पक्षाने दिलेल्या साक्षीदारांपैकी ५० टक्के साक्षीदारही सोडून दिले तरीही हा खटला इतक्यात संपणार नसल्याचं मत नोंदवत कोर्टाने इंद्राणीचा जामीन मंजूर केला. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी इंद्राणी मुखर्जीची बाजू कोर्टात मांडली.

सीबीआयची बाजू मांडणारे Additional Solicitor General एस.व्ही. राजू यांनी इंद्राणीच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला. परंतू या खटल्यातील सह आरोपी पीटर मुखर्जीलाही जामीन मंजूर करण्यात आल्याचं कोर्टाच्या लक्षात आणून दिल्यानंतर इंद्राणीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

Sheena Bora Murder: इंद्राणीची अनेक लग्न ते शीना बोराच्या हत्येचं गूढ… प्रत्येक वेळी समोर आलेलं धक्कदायक सत्य!

एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराचं अपहरण करुन हत्या झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला पोलिसांनी पकडून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य करत या प्रकरणात इंद्राणीचाही सहभाग असल्याचं पोलिसांना सांगितलं. गाडीत गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून रायगडमध्ये जाळण्यात आल्याचं ड्रायव्हरने पोलिसांना सांगितलं.

ज्यानंतर २०१५ साली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने इंद्राणी मुखर्जीसह तिचा पती पीटरला अटक केली होती. मार्च २०२० मध्ये पीटर मुखर्जीला स्पेशल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. काही दिवसांपूर्वीच इंद्राणीने जेलमध्ये असताना एका महिला कैदीने शीना बोराला आपण काश्मीरमध्ये पाहिल्याचं सांगत तपासाची मागणी केली होती. परंतू हा दावा सीबीआयने फेटाळला होता.

Sheena Bora: ‘शीना बोरा जिवंत आहे’, इंद्राणी मुखर्जीचा दावा… मग रायगडच्या जंगलात सापडलेला मृतदेह कोणाचा?

आतापर्यंत इंद्राणी मुखर्जीने २०१६, २०१७, २०१८, २०२० आणि २०२१ मध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. परंतू प्रत्येकवेळी तिच्या पदरात निराशा पडली. अखेरीस सुप्रीम कोर्टाने तिला जामीन मंजूर केला आहे.

    follow whatsapp