Sanjay Raut: देशाचं राजकारण प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभं आहे, हे श्रेय शिवसेनेचं

मुंबई तक

• 06:29 AM • 19 Jun 2022

देशाचं राजकारण हे प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवर उभं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी, कुंचला आणि वाणीच्या सहाय्याने शिवसेना उभी केली. त्यावेळी त्यांच्यावर प्रांतीयवादी असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली. त्या शिवसेनेला ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना स्थापन झाल्यावर देशभरातल्या विविध राज्यात प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. हे पक्ष भूमिपुत्रांचे […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

देशाचं राजकारण हे प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवर उभं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी, कुंचला आणि वाणीच्या सहाय्याने शिवसेना उभी केली. त्यावेळी त्यांच्यावर प्रांतीयवादी असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली. त्या शिवसेनेला ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना स्थापन झाल्यावर देशभरातल्या विविध राज्यात प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. हे पक्ष भूमिपुत्रांचे प्रश्न मांडत राहिले असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

सध्याचं देशातलं राजकारण हे प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभं आहे. याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंनाच जातं. सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं. आमच्या मतांवर दरोडा पडू नये म्हणून आमदारांना आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच काही वेळात उद्धव ठाकरे हे हॉटेलमध्ये येतील आणि कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Agneepath Scheme : ठेकेदारीवर गुलामांना ठेवलं जातं, लष्कराला नाही; संजय राऊत भडकले

नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाही यावर भाष्य

खून करणाऱ्या कैद्यालाही मतदानाचा अधिकार आहे. मग अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार का नही? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. लोकांनी त्यांना निवड़ून दिलं आहे. तरीही महाविकास आघाडीच्या दोन प्रतिनिधींना मतदानाचा हक्क नाकारला जातो आहे. या दोन्ही सदस्यांना कोणत्या न्यायानं मतदाना अधिकार नाकारला गेला त्याविषयी संभ्रम आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीची दोन मतं कमी करण्यासाठी पडद्यामागून हा खेळ सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्यसभा असेल विधानपरिषद निवडणूक असेल या निवडणुकीत आमदारांना ट्रेनिंग देण्याची गरज असते. त्यासाठी सगळे सदस्य एकत्र येतात असे राऊत म्हणाले. तसेच मतांवर दरोडा पडू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याचंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीची दोन मतं कमी करण्यासाठी पडद्यामागून खेळ सुरु असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. भाजपाकडून भ्रम निर्माण केला जात आहे, अफवा पसरवल्या जात आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत म्हणाले, “अशाप्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याविषयी कधीही चर्चा झालेली नाही. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांचा संवाद उत्तम आहे. कोणी कसं मतदान करावं याविषयी देखील काही निर्णय झाले आहेत. भाजपाने याविषयी कितीही भ्रम निर्माण केले, अफवा पसरवल्या तरी त्याचं फळ त्यांना मिळणार नाही.”

    follow whatsapp