TIFR Survey – मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका कमी संसर्गावर लक्ष ठेवावं लागेल

मुंबई तक

• 09:12 AM • 29 Jun 2021

मुंबई तक: कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना संसर्ग झाला त्यांना आणि तसाच संसर्ग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत होण्याची शक्यता असल्याची महिती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. पण असं असलं तरी तिसरी लाट मुंबईकरांसठी कमी त्रासाची ठरू शकते असा निष्कर्षही त्यांनी या अभ्यासात मांडलाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल भीती व्यक्त करण्यात येत आहे. डेल्टा आणि डेल्टा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई तक: कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना संसर्ग झाला त्यांना आणि तसाच संसर्ग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत होण्याची शक्यता असल्याची महिती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. पण असं असलं तरी तिसरी लाट मुंबईकरांसठी कमी त्रासाची ठरू शकते असा निष्कर्षही त्यांनी या अभ्यासात मांडलाय.

हे वाचलं का?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल भीती व्यक्त करण्यात येत आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे या लाटेबद्दल अधिक भीती व्यक्त करण्यात येतेय. पण ही तिसरी लाट मुंबईकरांसाठी तितकीशी त्रासदायक नसेल असा दावा टीआयएफआरचे अभ्यासक करताहेत. संदिप जुनेजा आणि दक्षा मित्तल यांच्या टीमने यासंदर्भात एक अभ्यास केला आहे. त्यात त्यांनी कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेपासून मुंबईला कमी धोका असल्याचा दावा केला आहे. तसंच कोरोना होऊन गेलेल्या नागरीकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला नागरीकांना पुन्हा होणाऱ्या या संसर्गावर अधिक लक्ष ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मुंबईला धोका का कमी असून शकतो ?

महामारी आल्यापासून 1 जून पर्यंत साधारण 17 महिन्यांच्या कालावधीत, कोरोनाच्या दोन लाटेत सुमारे 80 टक्के मुंबईकर हे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता मुंबईकरांना तितकीशी जाणवणार नाही. मुंबईतली दुसऱ्या लाटेतली सर्वाधिक रुग्णसंख्या ही दिल्ली आणि बेंगलुरूतल्या कथित दुसऱ्या लाटेच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी होती असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. त्याचं कारण मुंबईत पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणावर झालेला संसर्ग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या लाटेवेळी मुंबईत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण सुमारे 11,000 हजारांच्या घरात आढळले तर दिल्लीत दुसऱ्या लाटेवेळी एका दिवसात सर्वाधिक 28,000 रुग्ण तर बेंगलुरूमध्ये 25 हजार रुग्ण आढळले. मुंबईमध्ये 65 टक्के नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर दिल्लीमध्ये 55 टक्के लोकांना संसर्ग झाल्याचा दावाही टीआआरएफचे अभ्यासक करताहेत. एवढ्या मोठ्या लाटेशी लढण्यासाठीची योग्य तयारी आणि मोठया प्रमाणावर असेलल्या अँटीबॉडी यामुळे मुंबईकर दुसऱ्या लाटेपासून बचावले असंही या अभ्यासाच्या शेवटी आवर्जून नमूद कऱण्यात आलं आहे.

कोरोना होऊन गेलेल्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

या अभ्यासात मुंबई महापालिकेला पहिल्या लाटेत कोरोना होऊन गेलेल्यांना तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याची भीती असल्याबद्दल इशारा त्यांनी दिला आहे. तसंच पहिल्या लाटेत जेवढा त्रास या व्यक्तींना झाला होता तेवढा आणि तसाच त्रास तिसऱ्या लाटेत संसर्गाच्यावेळीही होईल, अशी शक्यताही या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोना होऊन गेलेल्यांना का आहे संसर्गाचा धोका?

पहिल्या लाटेत ज्यांना संसर्ग झाला त्यांच्या शरीरातील अँटिबॉडीचं प्रमाण कमी होत असल्यामुळे त्यांना तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याची शक्यता असल्याचं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. नवीन व्हायरस हा डेल्टापेक्षा 50 टक्के जास्त संसर्ग पसरवणारा आणि 50 टक्के जास्त घातक असल्याचं म्हणणं आहे.

तरीही या लाटेत कसं वाचता येईल

– जर पुन्हा होणारा संसर्ग हा सौम्य असेल

– घातक व्हेरीयंट आला नाही

– जून, जुलै, ऑगस्ट या महिन्याता मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं

– लस 75 ते 90 टक्के प्रभावी ठरली

तर ही लाट आणखी सौम्य असेल.

टीआयआरएफचा हा अभ्यास आणि पालिकेने केलेला सिरो सर्व्हे ज्यामध्ये 51 टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडी आढळल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय यामुळे मुंबईकरांसाठी येणारी तिसरी लाट घबराट वाढवणारी, त्रास देणारी नसेल अशी आशा व्यक्त करण्यात येतेय.

    follow whatsapp