महाबळेश्वरला अवकाळी पावसाचा फटका : स्ट्रॉबेरीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान

महाराष्ट्रात ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र या पावसाचा फटका आता महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. महाबळेश्वर, जावळी, भिलार या ठिकाणी झालेल्या पावसामुळे हातात आलेलं स्ट्रॉबेरीचं पिक वाया गेलं आहे. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना उरली सुरली स्ट्रॉबेरी कुजून जाईल अशी भिती आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची फळ खराब झाली आहेत. […]

Mumbai Tak

इम्तियाज मुजावर

• 06:03 AM • 02 Dec 2021

follow google news

महाराष्ट्रात ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र या पावसाचा फटका आता महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. महाबळेश्वर, जावळी, भिलार या ठिकाणी झालेल्या पावसामुळे हातात आलेलं स्ट्रॉबेरीचं पिक वाया गेलं आहे. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना उरली सुरली स्ट्रॉबेरी कुजून जाईल अशी भिती आहे.

हे वाचलं का?

अनेक शेतकऱ्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची फळ खराब झाली आहेत. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखांच्या घरात आर्थिक नुकसान होणार आहे. थंड वातावरणामुळे महाबळेश्वर आणि नजिकच्या पट्ट्यांत स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. महाबळेश्वरमध्ये २ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर स्ट्रॉबेरीचं पिक घेतलं जातं. या भागातील शेतकऱ्यांच्या मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत स्ट्रॉबेरी असल्यामुळे आता या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.

महाबळेश्वरमध्ये उत्पादीत झालेली स्ट्रॉबेरी ही बहुतांश प्रमाणात निर्यात केली जाते. या स्ट्रॉबेरीला २०० ते ३०० रुपये किलो असा दरही मिळतो. परंतू यंदा पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेल्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. अनेक फळांमध्ये आताच किड लागल्यामुळे स्थानिक बाजारातही हे उत्पादन घेऊन जाण्याचा काहीच फायदा नसल्याची हतबल प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान वाई तालुक्यात भिरडाची वाडी गावात रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे शिवाजी धायगुडे या मेंढपाळाच्या २० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत.

    follow whatsapp