Mumbai: लिफ्ट अडकली, दोघं फसले, मदत मिळण्यापूर्वीच खाली कोसळली, एक जागीच...

मुंबईतील बोरीवली शहरात इमारतीची पार्किंग लिफ्ट कोसळून भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे.

बोरीवलीत लिफ्ट कोसळून भीषण अपघात

बोरीवलीत लिफ्ट कोसळून भीषण अपघात

मुंबई तक

• 12:50 PM • 01 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत लिफ्ट कोसळून भीषण अपघात

point

इमारतीची लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू

point

बोरीवलीत कार पार्किंग लिफ्टमधील भीषण घटना

Mumbai News: मुंबईतील पश्चिम भागात शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इमारतीच्या कार पार्किंग लिफ्टमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. बोरीवलीतील प्रथमेश बिल्डिंग या 21 मजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट अचानक 7 मीटर खोल खड्ड्यात पडल्याने ही घटना घडली. 

हे वाचलं का?

दोन व्यक्ती लिफ्टमध्येच अडकले

न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, ही घटना सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास लिंक रोडमधील प्रथमेश बिल्डिंगमध्ये घडली. मुंबई फायर ब्रिगेडने दिलेल्या माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी तिथले दोन रहिवासी लिफ्टमध्ये अडकले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्याच्या मते, त्यावेळी लिफ्ट खाली पडताच त्यातील दोन्ही लोक गंभीर जखमी झाले.

एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि दोन्ही जखमी झालेल्या व्यक्तींना बाहेर काढले. यानंतर त्यांना जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. यादरम्यान, 30 वर्षीय शुभम मधमलाल धुरी यांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. तसेच, 45 वर्षीय सुंजीत यादव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: परळीत वैद्यनाथ मंदिर परिसरात मांसाहारी जेवण बनवलं, आरोप कुणावर? व्हायरल व्हिडीओमुळे तणाव

प्रत्यक्षदर्शींचं मत काय?

या दुर्दैवी अपघातानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये संतापजनक त्यासोबतच भितीचं वातावरण पाहायला मिळतंय. तिथल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते, पार्किंग लिफ्ट बऱ्याच दिवसांपासून खराब अवस्थेत होती आणि ती दुरुस्त करण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलं नव्हतं.

बीएमसी (BMC) आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, घटनास्थळ सील करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, अपघाताची चौकशी सुरू आहे आणि टेक्निकल टीम लिफ्ट कोसळण्याचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा: निर्वस्त्र अवस्थेत तरूणीचा मृतदेह, डोकं ठेचलेलं आणि शेजारी भाकरीचे तुकडे... वाशिमधील भयावह घटना काय?

स्थानिक नागरिकांची मागणी

या घटनेसंबंधी प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सोसायटीच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे. स्थानिक रहिवासींच्या मते, जर लिफ्टची वेळीच तपासणी करून दुरुस्ती केली असती तर हा अपघात घडलाच नसता.

    follow whatsapp